डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातर्फे २७ पासून विनामुल्य महाआरोग्य शस्त्रक्रिया व उपचार शिबिर

 जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयातर्फे दि २७ जानेवारी ते २ फेबु्रवारी पर्यत विनामुल्य महाआरोग्य शस्त्रक्रिया व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात ओपीडीत तपासणीसाठी आलेल्या रूग्णांना मोफत तज्ञांचा सल्ला,बी.पी,२ डी इको, इसीजी तपासणी केल्या जाणार असून सवलतीच्या दरात इतर तपासण्या केल्या जाणार आहे. तपासणी नंतर आवश्यक उपचार व शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात अ‍ॅडमिट झालेल्या रूग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया देखिल केल्या जाणार असून लागणा—या सर्व तपासण्या मोफत केल्या जाणार आहे.

शिबिरात जनरल सर्जरी, मुत्ररोग,दुर्बिणव्दारे शस्त्रक्रिया, कान,नाक,घसा, कर्करोग, मेंदू व मणका शस्त्रक्रिया, बालरोग,आणि स्त्रीरोग शस्त्रक्रिया देखिल केल्या जाणार आहे.याचबरोबर दारूमूळे झालेले लिव्हर,पोट आणि अन्न नलिकेचे आजार तसेच अस्थमा,दमा, टीबी, हदयरोग, त्वचारोग, मानसोपचार, बालरोग विकारावर देखिल मोफत उपचार करण्यात येणार आहे. या साठी नावनोंदणी आवश्यक असून रूग्णांनी येतांना जूने रिपोर्ट व आधार व रेशन कार्ड सोबत आणावे. अधिक माहितीसाठी स्वराली ९८२२१४९६५९ प्रणाली ९८३४५४९४८७ या क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.