सोशल मिडीयावर यादी व्हायरल, वाळूमाफियाशी संबध : ९ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी

शहरात घडणाऱ्या घटनांमध्ये अवैध धंदेवाल्यांसह वाळू माफियांसोबत पोलिसांचे आर्थीक हितसबंध असल्याचे आरोप होत आहे. या घटनांची गंभीर दखल घेत जळगाव विभागातील पाच पोलीस ठाण्यांसह एलसीबी आणि पोलीस मुख्यालयातील अशा एकूण ९ जणांची चौकशीसाठी तात्पुरत्या स्वरुपात पोलीस मुख्यालयात त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी सायंकाळी काढले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कालिंका माता मंदिरजावळ भरधाव वाळूच्या डंपरने चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली होती. यावेळी संतप्त जमावाने डंपर पेटवून देत पोलिसांवर वाळूमाफियांकडून हप्ते घेत असल्याचा आरोप केला होता.

शहरात घडणाऱ्या घटनांमध्ये संबंधीत पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचे अवैध धंदे चालकांसोबत असलेल्या आर्थीक संबंधामुळे संपुर्ण पोलीस दलावर आरोप होत असल्याने त्याची पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गंभीर दखल घेतली आहे.अवैध धंदेचालकांसह वाळूमाफियांसोबत संबंध असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्या संपुर्ण घटनांची गांर्भीय लक्षात घेत पोलीस अधीक्षकांनी जळगाव विभागातील एमआयडीसी, तालुका, शनिपेठ, रामानंद नगर, जिल्हापेठ, एलसीबी व शहर पोलीस ठाण्यातील ९ जणांना चौकशीसाठी तात्पुरत्या स्वरुपात त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. एकाच वेळी ९ जणांची उचलबांगडी झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ माजून गेली आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    धानोर्यातील वाळू साठ्यासाठी 14 लाखांवर लागणार बोली ; 28 नोव्हेंबरला होणार लिलाव ; लिलावा व्यतिरिक्त दुसरा वाळू उपसा होणार नाही यासाठी प्रशासन राहणार अलर्ट.

    धानोर्यातील वाळू साठ्यासाठी 14 लाखांवर लागणार बोली ; 28 नोव्हेंबरला होणार लिलाव ; लिलावा व्यतिरिक्त दुसरा वाळू उपसा होणार नाही यासाठी प्रशासन राहणार अलर्ट. एरंडोल : जळगाव तालुक्यातील धानोरा नजीकच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.