क्षुल्लक गोष्टीवरुन रिक्षा चालकाला लाथाबुक्क्यांनी मारलं, डोक्यात दगड घालून हत्या

पुण्यात एका क्षुल्लक वादातून रिक्षा चालकाची हत्या करण्यात आली आहे. तिघांनी मिळून या रिक्षा चालकाला आधी बेदम मारहाण केली त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केला. शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे दोन रिक्षा चालकांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. याच शाब्दिक वादातून तिघांनी मिळून एका रिक्षा चालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजेंद्र मुंगसे असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलिसांनी तिघाही आरोपींना अटक केली आहे. सोमेश अशोक सरोडे (वय २७, रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे), दिपक राजू साठे (वय १९, रा. नेहरूनगर, पिंपरी, पुणे) आणि ज्ञानेश्वर कांतीलाल डूकळे (वय १९, रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे) अशी या तीन आरोपींची नावं आहेत.

याप्रकरणी अनल राजेंद्र मुंगसे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली दिली होती.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे रिक्षा चालक राजेंद्र मुंगसे हे चालले होते. त्यावेळी पाठी मागून आलेल्या एका रिक्षा चालकाशी त्यांचे शाब्दिक वाद झाले. त्यावेळी समोरच्या रिक्षामध्ये असलेल्या चालकासाह दोघांनी मुंगसे यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजेंद्र यांच्या डोक्याला बेदम मार लागला, त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. राजेंद्र यांची हत्या केल्यानंतर तीनही आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला होता.घटनेची माहिती मिळताचत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि हत्येचा गुन्हा नोंद केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तपासाला सुरुवात केली. शिक्रापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचा शोध घेतला असता तपासादरम्यान एम एच १४ एल एस ०९१५ या रिक्षातील तिघांनी खून केल्याचे समोर आले. त्यांनतर पोलिसांच्या टीमने पुण्यातील कुदळवाडी परिसरातून त्या रिक्षासह तीन आरोपींना ताब्यात घेतले. रिक्षाच्या वादातून झालेल्या शाब्दिक वादातून सदर रिक्षा चालकाचा खून केल्याचे त्यांनी कबूल केले आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.