धरणगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी यांच्या सह अनेक अवैध धंद्यांना वर कारवाई कधी,,,,?

धरणगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी यांच्या सह अनेक अवैध धंद्यांना वर कारवाई कधी,,, ? तरूण पिढी वेशनाधिन अनेकांचे संसार उद्धवस्त, धरणगाव तालुक्यातील खर्दे, भामर्डी, सावळा नांदेड, सोनवद धरणगाव , या ठिकाणी सर्रास पणे गावठी हातभट्टी दारु राजरोसपणे विक्री केली जाते , धरणगाव शहर मुख्यत ग्रामीणभागात गावठी हातभट्टी यांसह अनेक अवैध धद्यांनी डोके वर काढले. सबंधीत विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले हातभट्टी उत्पादन, विक्रीला भलतेच जोर आले. गावठी हातभट्टी, विनापरवाना देशी विदेशी दारूचा मुक्त संचार सर्रास सुरू पाहायला मिळतो. वाढत्या अवैध धंद्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिक विशेषतः महिला वर्गात प्रचंड नाराजी आहे.

दुसरीकडे धरणगाव विभागात ठिकठिकाणी गावठी हातभट्टी, विनापरवाना देशी विदेशी दारूची विक्री बिनधास्त सुरू आहे. प्रौढ त्याहून अधिक तरुण वर्ग व्यसनाकडे वळत आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे, विविध प्रकारची दारू सहज उपलब्ध होत असल्याने पुन्हा सामाजिक स्वास्थ बिघडले. अवैध धंद्यांवर पोलीस सबंधीत उत्पादन शुल्क विभाग ठोस कारवाई करीत नसल्याने कारवाई नक्की करणार कोण ? असा नाराजीचा सवाल आता उपस्थित झाला. दरम्यान, तालुक्यात अनेक गावांच्या ठिकठिकाणी शेतात, मोकळ्या रानात, रस्त्याच्या कडेला दारूच्या बाटल्या, काचा, रिकाम्या प्लास्टिक फुग्यांच्या ढिग दिसत आहे, त्यातील बाटल्यांच्या काचा अनेकांच्या जीवावर उठतात. याकडे सबंधीत प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी आता जोर धरत आहे.

तालुक्याच्या सर्वच विभागात अवैध धंदे फोफावले. ग्रामीणात गावठी हातभट्टीने चांगलेच बाळसे धरले. जंगल भागात उत्पादीत होणारी हातभट्टी शहरालगत गाव टपऱ्यांवर सहज मिळत आहे. मात्र उत्पादन शुल्क विभाग नेहमीच अनभिज्ञ राहिला. गाववाडीपाड्यात देशी विदेशी दारूची सर्रास विक्री होते. दुर्गम जंगलात हटभट्टीला पीक आले असताना उत्पादन विभाग करतो काय ? असा आरोप अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांनी केला. धरणगाव विभागातील अनेक गावांत गावठी हातभट्टी मुख्यतः विनापरवाना देशी, विदेशी दारू सहजपणे उपलब्ध होते. त्याच दारूच्या बाटल्या कालवा, नदीपात्रात, रस्त्याच्या कडेला माळरानावर फेकल्या जातात. काही महाभाग बाटल्या फोडून असुरी आनंद घेतात, तर चकण्याच्या प्लास्टिक पिशव्या, गावठीचे प्लास्टिक रिकामे फुगे जिकडेतिकडे दिसून येत असल्याने स्वच्छता मोहिमेचा अक्षरशः बोजवारा उडाला. बियर व अन्य दारूच्या बाटल्या भंगारवाले घेत नसल्याने पर्यावरणाची हानी सुरुच आहे, गावठी हातभट्टी उत्पादन, विक्री, देशी विदेशी दारुचे विनापरवाना विक्री सर्रास असताना कारवाई का होत नाही, तरुणांना व्यसनाधीन करून बरबाद करण्याचा विडा सर्वच दारु विक्रेत्यांनी उचलले की काय, ही बाब कोणत्याच प्रशासनाला कशी माहित नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

गावठी हातभट्टी यांसह सर्वच अवैध धंद्यांविरोधात हातभट्टी विक्री करणाऱ्या विरोधात कधीच ठोस कारवाई झाली नाही. अखेर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याकडे सबंधीत प्रशासनाचे दुर्लक्ष असतानाच आता अनेक गावांच्या हद्दीत हातभट्टी, जोडीला विनापरवाना देशी, विदेशी दारूची विक्री सर्रास होत असल्याने सामाजिक स्वास्थ धोक्यात आले. याकडे उत्पादन शुल्क विभाग व तालुका पोलीस निरीक्षक फार गांभीर्याने लक्ष घालीत नाही, नेहमी काय कारवाई केली याची माहितीही दिली जात नाही, त्यामुळे उत्पादन शुल्क विभागबद्दल आधीच नाराजी आहे. शहरात विक्री होणाऱ्या विषारी ताडीमाडीलाही उत आले आहे त्या सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या प्रशासनाकडून अपेक्षा काय करावी ? असेही नागरिकांतून बोलले जाते. शहर ग्रामीणात सतत वाढत जात असलेल्या हातभट्टी विक्री, देशी विदेशी दारू विक्रीवर करणाऱ्यांवर आतातरी पोलीस व उत्पादन शुल्क विभाग ठोस कारवाई करतो का ? हे लवकरच समोर येणार आहे. दरम्यान, सबंधीत प्रशासनाने दशकापूर्वी घडलेल्या, सबंध महाराष्ट्राला, हादरवून सोडलेल्या देवकान्हे दारू हत्याकांडातून बोध घ्यावा, अवैधधंद्यांविरोधात मोहिम उघडावी, अशी अपेक्षा पुन्हा नव्याने व्यक्त झाली, त्यावर आता सबंधीत प्रशासन नेमकी काय कारवाई करतो ? या कडे तालुक्यातील सर्व नागरीकांनचे लक्ष लागले आहे ,

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.