युवा दिनानिमित्त देशमुख विद्यालयात अंतरवर्गीय कबड्डी व लंगडी सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन.

युवा दिनाचे औचित्य साधून अंतरवर्गीय कबड्डी व लंगडी सांघिक क्रीडा स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा, तसेच वैयक्तिक ऑलंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ विविध स्पर्धांचे आयोजन विद्यालयात करण्यात आले.स्पर्धांचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, संचालक नंदकुमार चौधरी, संचालक चंद्रकांत पाटील, तसेच मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. प्रास्ताविक श्री. वाय. जे. कुरकुरे यांनी केले. संचालक नंदकुमार चौधरी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितलेकी सांघिक खेळातून संघभावना देशप्रेम तसेच कारक कौशल्यांचा व मनाचा विकास होतो मनमुराद आनंद मिळतो  व स्तुप्त गुणांचा विकास होतो .


संस्थेतर्फे स्पर्धांमध्ये सहभाग .या अंतरवर्गीय स्पर्धांमध्ये इयत्ता ५ वी ते १२ वीच्या एकूण १२ संघांनी सहभाग घेतला. उद्घाटनप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर यांनी नाणेफेक करून स्पर्धेची सुरुवात केली. स्पर्धक संघांची ओळख व मार्गदर्शन संचालक नंदकुमार चौधरी , चंद्रकांत पाटील यांनी केले.
कबड्डी स्पर्धा निकाल . क्रमांक ८ वी ‘ब’ श्री संभाजीराजे संघाने श्री शिवाजीराजे संघावर २० गुणांनी विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक इयत्ता ६ वी ‘ब’ संघाने मिळवला.लंगडी स्पर्धा निकाल .
लंगडी स्पर्धेत केशव सोनवणे व रुचिका शिंदे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.उत्कृष्ट खेळाडूंचा गौरवसर्वांत उत्कृष्ट खेळाडू म्हणून इयत्ता ९ वी ‘ब’ मधील रितेश कोळी याची निवड झाली. प्रत्येक संघातून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आली: साहिल शिंदे (५ वी ‘ब’) ईश्वर सुरळकर (७ वी ‘ब’)उत्कर्ष सोनवणे (७ वी ‘ब’) जय बोदडे (८ वी ‘ब’) पूर्वेश पाटील (१० वी ‘ब’) मुलींमध्ये: मिनाक्षी चौधरी (७ वी ‘ब’) सरिता लहासे (१० वी ‘अ’) विद्यालयातर्फे उत्कृष्ट खेळाडूंना गौरवपत्र व उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर आणि संचालक चंद्रकांत पाटील यांनी एकहजार रुपयांचे पारितोषिक दिले. सर्व विजयी खेळांडूंचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी सचिव पवन चौधरी सर्व पदाधिकारी संचालक मंडळ यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे .
संघ व्यवस्थापन व नियोजन या सामन्यांसाठी पंच म्हणून क्रिडा समिती शिक्षक जे. ए. चौधरी, एन. ए. देशमुख, व गुणलेखक के. एम. पाटील, व एन. बी. चौधरी , के पी चौधरी यांनी जबाबदारी सांभाळली. संघ निवड व व्यवस्थापनाचे कार्य के. पी. चौधरी यांनी पार पाडले. मार्गदर्शन मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांनी स्पर्धा आयोजनाची प्रेरणा दिली व नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी आपल्या मनोगतात “शिस्त हा खेळाचा आत्मा आहे” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला क्रिडा समिती शिक्षकांसह टी पी घुले , कला शिक्षक एस बी सपकाळे , पी सी कचरे , जे पी चौधरी , एम के पाटील , एन बी चौधरी , एन डी पाटील , के एम पाटील , एस पी पाटील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.