शहरात प्रथमच मकर संक्रांतीच्या पर्वकाळात विधवा महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाचे संकल्पना श्रीमती संगीता विजयकुमार अहिरे प्रिन्सिपल साई माऊली इंटरनॅशनल स्कूल यांच्या मनात आली. आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्व विधवा महिलांनी त्यात सहभाग घेऊन मनापासून मनमोकळ्या पणाने आनंद घेतला. सगळ्यांची स्वप्न सगळे पूर्ण करतात पण विधवा महिलांच्या भावना त्यांचे विचार ते मनात न दडपता, विधवा होने तिच्या हातात नाही त्यात तिचा काय गुन्हा एकतर तिचा जोडीदार गेलेला असतो त्यात समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, प्रत्येक संकटाला स्वतः सामोरे जावे लागते, पण लोक काय म्हणतील या विचाराने आयुष्यभर स्वतःशी संघर्ष करत असते.

सगळ्यांच्या भावना ती जपते पण स्वतः मात्र मागेच राहते. पुरुषांला बायको मेल्यावर त्याचे कोणतेच हक्क काढून घेतले जात नाही पण स्त्रीला विधवा झाल्यावर कुंकू लावणे जोडवे घालने मंगळसूत्र घालने ओटी भरणे अशा अनेक गोष्टी तिच्यापासून काढून घेतल्या जातात पण नव्याने सुरुवात करूया सुरुवात आपल्यापासून का नाही या विचाराने सर्वांना प्रेरित करून सर्व महिलांनी पहिल्यांदा कुंकूच वान देउन सन्मानित करून नंतर जेवण दिले बऱ्याच जणांच्या डोळ्यातून फक्त पाणी वाहत होतं अनेक महिलांनी मनसोक्त मन मोकळं केलं . काहीच्या भावना आवर घालणं अवघड होतं. जे झालं ते विसरू शकत नाही ती जागाही कोणी भरून काढू शकत नाही पण एकमेकांच्या सहृय्यातून एकमेकांना मदत करून एकमेकाची हितचिंतक बनवून, ताकद म्हणून काही प्रसंगाला आला तरी ती आपल्या भावना सांगून एकजूट होऊन तिला मदत करणार असे सर्वानुमते ठरले .एक ग्रुप श्रीमती म्हणून तयार केला कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांना मदत करतील या विचाराने नियोजन झाले नातेवाईक लांब असतात पण हक्काच व्यासपीठ मैत्री ही नातं असं असतं सर्व भावना मनमोकळेपणाने सांगितले जातात. शेकडो महिला स्वतः उपस्थित राहिल्या खूप आनंद वाटला दुखी चेहरे जेव्हा आनंदी झाली कोणीतरी आपला हक्काचा आहे अशी भावना त्यांच्या चेहऱ्यातून ओसडुंन वाहत होती. जिथे संतांनी यज्ञाला श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी विधवा महिलांना यज्ञ करण्यास अनुमती दिली यज्ञ म्हणजे परमेश्वराला जेवण घालणं होय. तर कुंकू लावण्यास काही हरकत नाही . सर्व महिलांचा आत्मविश्वास वाढला सर्वांचे कुंकू लावलेले चेहरे आनंदी चेहरे डोळ्यासमोर दिसत होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर सौ संगीता देवरे, श्रीमती.अनुपमा देशमुख, बाल विकास अधिकारी शितल पाटील माऊली फाउंडेशनच्या सर्वेसर्वा श्रीमती गुताई सूर्यवंशी माजी नगरसेविका योजनाताई पाटील उपस्थित होते सूत्रसंचालन सोनाली महाजन आणि रिंकू पाटील यांनी केले तर चैताली पवार, मनीषा पाटील, कविता सोनवणे लहान खेडगाव, साई माऊली स्कूल ची टीम यांचे अनमोल असे सहकार्य लाभले साई माऊली स्कूलचे पालक व चेअरमन विजय वामनराव देवरे यांचे लाभले चंदाताई यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.









