अखिल विश्वकर्मीय समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समस्त महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय संस्था / सर्व समाज बांधव पुरस्कार दिनांक 19 जानेवारी 2025 समाजाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान केला जाणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष लखन आहेर यांनी कळविले आहे. अखिल विश्वकर्मीय समाज संघ गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक न्याय, शैक्षणिक जागरुकता आणि युवकांसाठी लढा देणारी एक प्रभावी संघटना आहे. 19 जानेवारी रोजी संघटनेचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा साजरा करताना हा दिवस केवळ एक उत्सव नसून समाजासाठी प्रामाणिक योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्याचा सोहळा ठरणार आहे.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व मान्यवरांच पुरस्कार देऊन गोरव करण्यात येणार आहे. आपल्या कार्याच्या माध्यमातून सत्य आणि न्यायाची मशाल जिवंत ठेवणाऱ्या आणि समाजाला नवा दृष्टिकोन देणाऱ्या व्यक्तिमत्वाची आपण सन्मानसाठी निवडले गेल्याबद्दल विश्वकर्मीय समाज संघातर्फे हार्दिक अभिनंदन स्वीकारावे.आपण 19 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता ठिकाण-इंद्रकुंड पलूस्कर हॉल पंचवटी कारंजा नाशिक याठिकाणी सन्मान सोहळ्यास उपस्थित राहावे, हि आमची नम्र विनंती.गौरव सोहळ्यात निवड करताना विचारात घेतलेले निकष : 1. सत्य आणि पारदर्शक कार्य 2. समजाबद्दलचे योगदान 3. लोकशाही मुद्यांचे रक्षण 4. समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्यहा सन्मान म्हणजे समाजातील महत्वाच्या स्तंभानपैकी विशेष व्यक्तींना सलाम आहे. समाज्या बद्दलच्या आपल्या कार्यातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि आपल्या अथक परिश्रमाने समाजाला दिशा देणाऱ्या समजरत्नांचा ‘विश्वकर्मीय समाज राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025’ या निमित्ताने सन्मान करीत आहो ..!









