आप्पासो.देवरे विद्यालयाच्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड.

नंदुरबार येथील डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल येथे २६ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले.या विज्ञान प्रदर्शनात समारोप दिवशी बक्षीस,पारितोषिक वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानी कुमुदिनीताई विजयकुमार गावित (माजी जि. प.अध्यक्षा) प्रमुख अतिथी सावन कुमार (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नंदुरबार) प्रवीण अहिरे (शिक्षणाधिकारी माध्य.नंदुरबार)वंदना वाळवी ( शिक्षणाधिकारी प्राथमिक, नंदुरबार) डॉ.युनूस पठाण (उपशिक्षणाधिकारी माध्य.)भावेश सोनवणे (उपशिक्षणाधिकारी योजना) पुष्पेन्द्र रघुवंशी (सचिव जिल्हा मुख्याध्यापक संघ) यांच्या हस्ते संपन्न झाले.

नंदुरबार जिल्हा विज्ञान प्रदर्शनात धंगाई विधायक कार्य मंडळाचे आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता.नंदुरबार येथील इ.आठवी वर्गाचा विद्यार्थी दिपेश मनोहर लोहार व रुपेश विशाल पाटील यांच्या “कचऱ्यापासून विद्युत निर्मिती व कचऱ्याची योग्य विल्हेवाट” या उपकरणास लहान गटातून जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन विद्यालयातील सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना गौरवण्यात आले. सदर उपकरणाचे अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ५२ व्या विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके,विज्ञान शिक्षक सी.व्ही.नांद्रे, एम.डी.नेरकर,एम.एस.मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वितांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे,शालेय समितीच्या अध्यक्षा शैलजा देवरे, संस्थेचे पदाधिकारी एस.ए. देवरे,एन.ए.देवरे महाराष्ट्र विज्ञान महामंडळाचे मार्गदर्शक दत्तात्रय आरोटे,अध्यक्ष दिनेश पवार , कोषाध्यक्ष पी.झेड.कुवर, संजय पवार,विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे पंचक्रोशीतील, विखरण,नाशिंदा, खापरखेडा,बोराळा या गावातील पालकवर्ग, ग्रामस्थांकडून कौतुकासह अभिनंदन करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.