ज्याप्रकारे संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्याचप्रकारे ९ महिन्यांपूर्वी अवादा कंपनीच्या मॅनेजरचंही अपहरण करण्यात आलं होतं.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ९ डिसेंबर २०२४ ला संतोष देशमुख यांचं अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतिक घुले, जयराम चाटे, महेश केदार या सहा जणांचा समावेश असल्याचं समोर आलं होतं. तसेच, याप्रकरणात विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान आता ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.










