देबूबाई टाकळकर या गेल्या २० वर्षापासून भाजीपाला नारायणगाव येथे विकण्यासाठी जात होत्या. एवढ्या वयात देखील त्या शेतात काम करत असत. संपूर्ण आयुष्य शेतात गेले. मात्र आज त्यांच्या आयुष्याचा प्रवास शेवटचा ठरला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हरपल्याची भावना कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.










