बारालिंग यात्रेत मुलीची छेड काढली, दोन गटात मोठा वाद अन् वातावरण तापले; नांदेडात तणाव.

जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथील बारालिंग यात्रेत बुधवारी रात्री राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. मुलींची छेड काढण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा झाला. पोलिसांच्या वाहनावर आणि शहरात दगडफेकही करण्यात आली. यामुळे तामसामध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथील बारालिंग यात्रेत बुधवारी रात्री राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. मुलींची छेड काढण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा झाला. पोलिसांच्या वाहनावर आणि शहरात दगडफेकही करण्यात आली. परिणामी तामसा मध्ये दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दोन्ही गटातील ३० ते ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बुधवारी तामसा येथे बारालिंग यात्रा पार पडली. ही यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर यात्रेदरम्यान भाजी भाकरची पंगत भरवण्यात आली होती. याच गर्दीचा फायदा घेत काही तरुणांनी मुलींची छेड काढण्याचा प्रकार उघडकीस आला. यावरुन तरुणांच्या दोन गटात वाद झाला. यात्रेला गालबोट लागू नये म्हणून तो वाद तेथेच मिटवण्यात आला. परंतु रात्री उशीरा जुन्या गावातील रस्त्यावर मोटारसायकल अडवून त्याला मारहाण करण्यात आली. यावेळी भांडण सोडवायला गेलेल्या ग्रामपंचायत सदस्य शाकीर पठाण उर्फ इरफान खान पठाण यांचे डोके फुटल्याची माहिती आहे. याच दरम्यान तामसा होळीगल्ली, डॉ. हेडगेवार मार्केट, आठवडा बाजारातून तुफान दगडफेक झाली.पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले असता त्यांच्याही गाडीवर दगदफेक करण्यात आली. परंतु पुढे पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे होणारा अनर्थ टळला. आठवडी बाजारात जमलेल्या जमावाने तामसा जुने बसस्थानक चौकात दगडफेक केल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मध्यरात्रीनंतर पोलीस राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली. याप्रकरणी मारहाणीत चारजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करीत शांततेचे आवाहन केले.याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. अनेकजण फरार आहेत, शहरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, तामसा येथील समाजकंटकांनी व्यापाऱ्यांच्या दुकानांवर दगडफेक करून केलेल्या नुकसानीच्या निषेधार्थ गुरुवारी व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवून आरोपींना अटक करण्याची मागणी करणारे निवेदन तामसा पोलिसांना देण्यात आले. अनेक पालकांनी भीतीपोटी पाल्यांना शाळेत न पाठवल्याने शहरातील शाळा भरल्याच नाहीत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.