जळगाव शहरातील अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. शिव कॉलनीतील रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने भीषण घटना घडली आहे.जळगाव शहरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी वैजनाथ येथून वयोवृद्ध भारमल पाटील हे उपचारासाठी जळगावकडे त्यांच्या दुचाकीवरुन निघाले होते. मात्र जळगाव शहरात शिव कॉलनी इथे पोहोचल्यानंतर एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की भारमल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.










