खेळामध्ये सांघिक भावना असणे खूप महत्वाचे : आ. राजूमामा भोळे

 १५ जानेवारी २०२५ । खेळामध्ये सांघिक भावना असणे खूप महत्वाचे असते. लेवा पाटीदार समाजाच्या क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण संघाना प्राधान्य मिळाले हि चांगली गोष्ट आहे. उगवत्या खेळाडूंसाठी अशा स्पर्धा खूप मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले.शहरातील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सरदार वल्लभभाई पटेल चषक स्पर्धेचे आयोजन दि. १४ ते १९ जानेवारी दरम्यान सागर पार्क मैदानात आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ८ सामने खेळले गेले. लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे हे सहावे पर्व आहे. स्पर्धेसाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री रक्षाताई खडसे या ब्रँड अँबेसिडर आहेत. स्पर्धेमध्ये २४ संघ सहभागी होत असून यंदा प्रथमच जिल्ह्यातील ग्रामीण भागातून प्रतिनिधित्व करणारे संघ सहभागी झालेत.

स्पर्धेचे संध्याकाळी ७ वाजता शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व चेंडू खेळून उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, माजी महापौर ललित कोल्हे, सुवर्ण उद्योजक भागवत भंगाळे, फैजपुरचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे, सुनील सरोदे, हर्षल ढाके, डॉ. अनंत पाटील, चेतन पाटील हे उपस्थित होते. यावेळी डॉ. केतकी पाटील आणि ललित कोल्हे यांनी मनोगतातून स्पर्धेला शुभेच्छा दिल् यांनी सांगितले की, फिटनेस राखण्यासाठी आणि छंद म्हणून खेळण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा मदतनीस ठरतात. स्पर्धेला मंगळवारी दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता मोरया कन्स्ट्रक्शन आणि ओम बिल्ड चॅम्प या संघांमधील सामन्याने सुरुवात झाली. ओम बिल्ड चॅम्प संघाने ५२ धावांनी मोरया संघाचा पराभव केला. तर नंतर झालेल्या भूमी वॉरियर्स आणि लीड्सकेम्स यांच्यात एकतर्फी सामना झाला. त्यात लीड्सकेम संघाने भूमी संघाचा १३५ धावांनी दारुण पराभव केला. सोयो सनरायडर्सने तिसऱ्या सामन्यात अमेय नाईटकिंग्स संघाला ८ धावांनी हरविले. सातपुडा वोरियर्स खिरोदा संघाने ५ गड्यानी विजय मिळवून महालक्ष्मी बिल्डर संघाला नमविले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.