पतंग उडवतांना दुसऱ्या मजल्यावरुन पडल्याने बालक गंभीर जखमी !

भावासह गल्लीतल्या मित्रांसोबत गच्चीवर पतंग उडवित असतांना तोल जाऊन दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने लोक कैलास गिरगुणे (वय ७, रा. रामेश्वर कॉलनी) हा बालक गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच बेशुद्ध झाल्याची घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. या बालकावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर पतंग आणि मांजामुळे गंभीर दुखापत झाल्याच्या वेगवेगळ्या घटना सायंकाळपर्यंत शहरात घडल्या असून जखमींवर जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीतील कैलास गिरगुणे कुटुंबातही उत्साहाचा वातावरण होते. सकाळपासून त्यांची दान्ही मुले गल्लीतील काही मुलांसोबत गच्चीवर पतंग उडविण्याचा आनंद घेत होते. पतंग उडवित असलांना श्लोक गिरगुणे या सात वर्षीय बालकाचा गच्चीवरुन तोल गेला आणि तो थेट खाली जमिनीवर येऊन कोसळला. जमिनिवर असलेल्या फरशीवर पडल्याने त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली व बेशुद्ध पडला. ही घटना त्याच्या कुटुंबियांसह शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी लोकला तात्काळ परिसरात असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले.दुसऱ्या मजल्यावरुन पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या लोकवर त्याला तातडीने अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते, रात्रीपर्यंत तो बेशुद्धावस्थेतच होता अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. नवीन वर्षातील पहिला सण असल्याने श्रोष हा भावासह मित्रांसोबत पतंग उडविण्याचा आनंद घेत होता. गच्चीवरुन पडल्याने तो गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. मुलावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याने त्याचे कुटुंबीय व इतर सर्व जण बाहेर चिंतातूर असल्याचे चित्र रुग्णालयाबाहेर दिसून आले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.