चौक सूशोभिकरण्याबाबत मुख्याधिकारी निवेदन. शहरातील पेठ चौफुलीवर असलेल्या गोल सर्कल मध्ये सुशोभिकरण करण्यात यावे. यासंदर्भात पेठ भागातील तरुणांनी भडगांव नगरपरिषद चे मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम उपविभाग साहाय्यक अभियंता श्रेणी.०१ यांना निवेदन दिले.
निवेदन म्हटलं आहे कि भडगांव पेठ चौफुलीवर पारोळा रोड व एरंडोल रोड च्या मध्येभागी असलेल्या गोल सर्कल मध्ये सुशोभिकरण करून शिवसृष्टी उभारावी. अशी मागणी सदर निवेदनातुन करण्यात आली आहे. यावेळी कपिल पाटील, दुर्गेश काळे, अशुतोष पाटील, संकेत मराठे, दुर्गेश गाडगे, हर्षल पाटील,अजय पाटील,शुभम निकुंभ , हरिश काटे, धनंजय मराठे, ज्ञानेश्वर पाटील,श्रेयस कासार, प्रतिक नरवाडे, कल्पेश पाटील, आदी उपस्थित होते.









