थोरगव्हाण देशमुख विद्यालयात 12 जानेवारी:राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद जयंती निमित्त प्रतिमा पुजन संपन्न

थोरगव्हाण देशमुख विद्यालयात 12 जानेवारी:राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद जयंती निमित्त प्रतिमा पुजन संपन्न१२ जानेवारी, हा दिवस दोन महान विभूतींच्या जयंती निमित्ताने साजरा केला . राजमाता जिजाऊ आऊसाहेब आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या योगदानाला दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण स्थापना 1917 व डी एस देशमुख माध्य. उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण यांचे कडून उपाध्यक्ष ऊमाकांत बाऊस्कर प्रतिमा पुजन पुष्पमाळा वाहून त्यांचे कार्याचे स्मरण केले .

राजमाता जिजाऊ (आऊसाहेब) जिजाबाई, ज्यांना प्रेमाने जिजाऊ असे संबोधले जाते, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आहेत. त्यांच्या चरित्रात एक स्फूर्तिदायक प्रेरणा सामावलेली आहे. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांमध्ये स्वराज्याची भावना जागृत केली व त्यांच्या शौर्यपूर्ण जीवनाचा पाया रचला. त्यांच्या संस्कारांमुळेच शिवाजी महाराजांनी भारताच्या इतिहासात एक सुवर्ण पान लिहिले. ‘अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान, पुत्र घडविला असा, जो राष्ट्राची शान.’ हे शब्द जिजाऊंच्या कर्तृत्वाचे दर्शन घडवतात. युगपुरुष स्वामी विवेकानंदयाच दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंतीही साजरी केली जाते. त्यांनी भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचे जागतिक स्तरावर दर्शन घडवले. ‘उठा, जागे व्हा, जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत थांबू नका’ हा त्यांचा संदेश आजही तरुणाईला प्रेरणा देतो. विवेकानंदांच्या शिकवणींनी भारतीय जनतेला आत्मनिर्भरतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला.

स्मरणोत्सव आणि सन्मान निमित्त सावित्रीबाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ जयंती सप्ताह निमित्त थोरगव्हाण तसेच पंचक्रोशितील 15 आदर्श कर्तुत्ववान महिला यांचा सन्मान संपन्न झालाआणि स्वामी विवेकानंद यांचा संस्था शाळे तर्फे त्यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांचा आदर व्यक्त केला .प्रतिमा पुजन प्रसंगी दिनविशेष महत्व सांगतांना मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांनी म्हटले की राजमाता जिजाऊ तसेच राष्ट्रपुरूष यांच्या कार्य शिकवणुकींचा आदर्श घेतला जावा. जिजाऊंच्या शौर्य धैर्यपूर्ण संस्कारांचा आणि विवेकानंदांच्या विचारांचा आदर्श ठेवून, तरुण पिढीला प्रगतीचा मार्ग आजच्या युवती युवकांना सुकर करता येईल.जयंतिनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा! करण्यात आला . या प्रसंगी मान्यवरांसह जेष्ठ लिपिक रविंद्र चौधरी पालक भगवान पाटील शिक्षकेतर कर्मचारी बंधु संजय ( योगेश ) झोपे, अक्षय तायडे उपस्थित होते .

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.