माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मदिनी सावित्रीच्या लेकीचा सन्मान!

माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मदिनी सावित्रीच्या लेकीचा सन्मान!सत्यशोधक समाज संघाकडून सत्यशोधिका ललिता वाघ यांचा शाल-ग्रंथ देऊन सन्मान ! जगातील सर्वोत्तम मातृत्व-कर्तृत्व-नेतृत्व, कुळवाडीभूषण-बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शक, गुरु, स्वराज्य संकल्पिका, स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

३ जानेवारी सावित्रीमाई फुले जयंतीचे औचित्य साधत सावित्री शक्तीपीठ पुणे, यांच्या वतीने सत्यशोधिका ललिता राजेंद्र वाघ यांना “सावित्रीबाई फुले पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले होते. आज माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत सावित्रीच्या लेकीचा सन्मान करण्यात आला. सत्यशोधक समाज संघ धरणगाव यांच्याकडून सौ.ललिता वाघ व राजेंद्र वाघ यांचा सपत्नीक शाल, पी डी पाटील लिखित आदर्श महामाता व जगद्गुरु तुकोबाराय यांचा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, संघटक लक्ष्मणराव पाटील, गोरख देशमुख, एच डी माळी, सुनील देशमुख, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा ज्योती पाटील, वेणु पाटील यांसह शहरातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.