युक्रेनच्या पाहुण्या ‘टोरेस’च्या सूत्रधार; व्हिक्टोरिया अन् ओलेना प्रमुख आरोपी असल्याचा संशय

लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘टोरेस’ कंपनीच्या योजनांमागे युक्रेनच्या नागरिक व्हिक्टोरिया कासातोव्हा आणि ओलेना स्टोयन या प्रमुख आरोपी असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे.दुप्पट, तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘टोरेस’ कंपनीच्या योजनांमागे युक्रेनच्या नागरिक व्हिक्टोरिया कासातोव्हा आणि ओलेना स्टोयन या प्रमुख आरोपी असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने या दोघींनी भारतातून पळ काढल्याचा पोलिसांना संशय आहे. मुंबई पोलिसांची पथके या दोघींच्या मागावर असून व्हिक्टोरिया, ओलेना, तानिया आणि व्हॅलेंटिना या विदेशी महिलांनी इतर साथीदारांना हाताशी घेऊन फसवणुकीचा हा व्यवसाय सुरू केल्याचे म्हटले जात आहे.
प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे ‘टोरेस’ या नावाने मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर या शहरांमध्ये ब्रँड सुरू करून वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक स्वीकारण्यात आली. गुंतवणूकदारांना कृत्रिम खड्यांचे आणि प्रत्येक आठवड्याला पाच ते साडेअकरा टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले. चांगला परतावा मिळत असल्याने राज्यभरातील नागरिकांनी यात गुंतवणूक केली, सुरुवातीला गुंतवणूकदारांना परतावा मिळाला; मात्र नंतर काही आठवडे परतावा येणे बंद झाल्याने गुंतवणूकदाराच्या मनात शंका आली.दादर येथील शाखेत गोंधळ उडल्यानंतर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून संचालक सर्वेश सुर्वे, उझबेकिस्तानी नागरिक तानिया (व्यवस्थापक) तर, रशियन नागरिक व्हॅलेंटिना स्टोअर (व्यवस्थापक) या तिघांना अटक करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी तौफिक शेख ऊर्फ कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवलेंका हे आरोपी फरारी आहेत. सर्वेश हा सर्वसामान्य घरातील तरुण असून तो नामधारी असल्याचे म्हटले जात आहे. अटकेत असलेल्या व्हॅलेंटिना, तानिया आणि फरारी आरोपी व्हिक्टोरिया, ओलेना याच या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असल्याचे सांगितले जाते. या गुन्ह्याची व्याप्ती पाहता यामागे बरेच आरोपी असण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.
तपास वर्ग केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठिकठिकाणी छापे आणि झाडाझडती सुरू केली. टोरेसच्या वेगवेगळ्या शाखा आणि अटक आरोपींच्या निवासस्थानी छापे टाकून पोलिसांनी पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम हस्तगत केली. जप्त रकमेपैकी ७७ लाख रुपये हे तानिया कुलाबा येथे भाड्याने राहत असलेल्या घरातून हस्तगत करण्यात आले, तर उर्वरित रक्कम ‘टोरेस’च्या कार्यालयात सापडली.टोरेसच्या दादर येथील कार्यालयात पाच जानेवारीला कंपनीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये टोकाचे वाद झाले. ‘खोटी योजना चालवता, खोटे खडे वाटेल त्या किंमतीला विकता’ अशा वेगवेगळ्या कारणांवरून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या वादामुळे संतापलेल्या काहींनी त्यांच्या संपर्कात असलेल्या गुंतवणुकदारांना याबाबतची माहिती दिली आणि बोलावून घेतले. एकाचवेळी मोठ्या संख्येने गुंतवणूकदार जमा झाल्याचे कळताच शिवाजी पार्क पोलिस टोरेसच्या कार्यालयात पोहोचले आणि टोरेसच्या योजनांचे बिंग फुटले.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.