‘मी पत्नी, मुलगी आणि भाचीला संपवलं…’ रक्ताने माखलेला चाकू घेऊन होमगार्ड पोलीस ठाण्यात पोहोचला

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या होमगार्डने आपली पत्नी, मुलगी आणि भाचीची हत्या केली आणि चाकू घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. येथील पेन्या पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास एक व्यक्ती रक्ताने माखलेला चाकू घेऊन पोहोचला. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच त्याने सांगितले की, मी नुकतीच पत्नी, मुलगी आणि भाचीची हत्या केली आहे. आता मी तुम्हाला शरण येत आहे. हे ऐकून तेथे उपस्थित सारे पोलिसही चक्रावले. पोलिसांनी तात्काळ त्याला बेड्या ठोकल्या आणि त्याची चौकशी केली. आरोपीने स्वत:च्या गुन्ह्याची देत संपूर्ण घटना सांगितली. त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे रागाच्या भरात त्याने तिला मारुन टाकले. मुलगी व भाचीने त्याला अडवले असता त्याने त्यांचीही हत्या केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, गंगाराजू हा मूळचा नेलमंगला येथील रहिवासी आहे. ४० वर्षीय गंगाराजू हा बंगळुरू अर्बनमधील हेब्बागोडी पोलिस स्टेशनमध्ये होमगार्ड म्हणून कार्यरत होता. त्याची पत्नी भाग्या आणि मुलगी नव्या व्यतिरिक्त भाग्याच्या बहिणीची मुलगी हेमावती देखील त्यांच्या जलाहल्लीतील चोक्कसंद्र येथे वास्तव्यास होते. त्यांचे कुटुंब गेल्या ६ वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत होते. भाग्या ही गृहिणी होती तर १९ वर्षांची नव्या एका खाजगी महाविद्यालयात पदवी शिक्षणाच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. पतीकडून घटस्फोट घेतल्यानंतर हेमावती मावशीकडे राहत होती.पोलिसांना दिलेल्या कबुलीत गंगाराजूने सांगितले की, त्याची पत्नी भाग्य (३८ वर्षे) हिचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यामुळे घरात रोज खटके उडत होते. या भांडणात दोन्ही बहिणी भाग्याला साथ देत होत्या, त्यामुळे गंगाराजू निराश झाला होता. बुधवारी दुपारीही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर त्याने पत्नीवर चाकूने हल्ला केला. दोन्ही मुलींनी त्याला रोखले असता त्याने रागाच्या भरात त्यांच्यावरही हल्ला केला. तिघांची हत्या झाल्यानंतर आरोपीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून आपल्याला आत्मसमर्पण करायचे असल्याचे सांगितले.अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार यांनी याप्रकरणी सांगितले की, आरोपी गंगाराजूच्या आत्मसमर्पणानंतर पोलिसांचे पथक त्याच्या चोक्कसांद्रा, जलाहल्ली येथील घरात पोहोचले आणि तीन महिलांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा असून गळा चिरला होता. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने आता आयपीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरू आहे.
  • Related Posts

    कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

    कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन जळगांव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध…

    नंदुरबार जिल्हयात स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्याची उच्च न्यायालयातील ॲड. मनोज सूर्यवंशी यांची मागणी…

    नंदुरबार जिल्हयात स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्याची उच्च न्यायालयातील ॲड. मनोज सूर्यवंशी यांची मागणी…सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्यामार्फत आयोजन करण्यात येत असलेली सेट परीक्षा करिता नंदुरबार जिल्ह्यातून अनेक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

    कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

    नंदुरबार जिल्हयात स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्याची उच्च न्यायालयातील ॲड. मनोज सूर्यवंशी यांची मागणी…

    नंदुरबार जिल्हयात स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्याची उच्च न्यायालयातील ॲड. मनोज सूर्यवंशी यांची मागणी…

    धरणगाव – सोनवद बाभुळगाव रस्त्यालगत विट भट्ट्या मालकांनी उडवल्या नियमांची धज्जीया

    धरणगाव – सोनवद बाभुळगाव रस्त्यालगत विट भट्ट्या मालकांनी उडवल्या नियमांची धज्जीया

    रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शाळेतील मुलांना जुंपलं, जिल्हा परिषद शिक्षकांचा कारनामा; पालकांकडून संताप व्यक्त

    रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शाळेतील मुलांना जुंपलं, जिल्हा परिषद शिक्षकांचा कारनामा; पालकांकडून संताप व्यक्त

    चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीलाच संपवले, नंतर अपघाताचा रचला बनाव; असा फसला डाव…