धरणगाव – सोनवद बाभुळगाव रस्त्यालगत विट भट्ट्या मालकांनी उडवल्या नियमांची धज्जीया .रस्ता व वीट रस्ता व वीट भट्टी याच्यात अंतर दाखवा आणि बक्षीस मिळवा.
धरणगाव – सोनवद, अहिरे, बाभुळगाव रस्त्यालगत असलेल्या विट भट्ट्या रस्त्याच्या कडेला लाकडे, व माती चे ढिग आहेत, येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे, यामुळे सोनवद, अहिरे व आजुबाजुला असलेल्या परीसरातील नागरीकांच्या आरोग्याचा व पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, रस्त्यावर लगेच वीटभट्टी लावली असून रस्त्यावर चिखल व माती पडलेली असून वाहनांच्या अपघात होत आहे.
येथील वीट भट्टी चालक मोठ्या प्रमाणावर केमिकलचा वापर हे करत आहेत यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित विभागांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. परीसरात वीट पारंपरिक पद्धतीने बनविले जाते, मातीचे साचे बनवून ते एक मेकांनावर रचुन भट्टी बनवली जाते व दगडी कोळसा चे यामध्ये इंधन म्हणून यामध्ये उपयोग करण्यात येतो, प्रदूषण नियंत्रण मंडळा नुसार इंधन म्हणून वापरात येणाऱ्या दगडी कोळशाच्या ज्वालानंतर सल्फर डाय ऑक्साइड कार्बन डाय-ऑक्साइड कार्बन मोनॉक्साइड आणि नायट्रोजन मधील ऑक्साईड या विषारी वायूचे उत्सर्जन होते या विषारी वायूमधील सल्फर डाय ऑक्साईडमुळे डोळ्यांचे विविध विकार आणि हवेतील नायट्रोजन मधील डाय-ऑक्साइडमुळे फप्पु साचे व त्वचेचे आजार होतात तसेच कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डाय-ऑक्साइड या विषयावर वायूमुळे वीट भट्ट यांच्या परिसरातील तापमानात वाढ होऊन सभोवताच्या शेतीवर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होते, या सर्व कारणांमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीट भट्टी सुरू करण्यासंदर्भातील नियम सक्तीचे केले आहेत. परंतु येथील वीट पट्टी चालकांनी सर्व नियम धाब्यावर बसवलेले आहेत यात कोणतेही नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. विविध भट्टी चालक प्रदूषण नियंत्रण मंडळाची कुठलीही परवानगी न घेता वीट भट्टा सुरू करत असतात अशी नागरिकात चर्चा आहे, एवढे सर्व सुरू असताना संबंधित विभागाला जाग आली नाही का असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडलेला आहे. अशा सर्व नियमांचे पायमल्ली करणाऱ्या वीट भट्टी चालकांवरती संबंधित विभाग काय कारवाई करतात याकडे सर्व जनतेचे लक्ष लागू आहे.