रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शाळेतील मुलांना जुंपलं, जिल्हा परिषद शिक्षकांचा कारनामा; पालकांकडून संताप व्यक्त

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनाच कामाला जुंपल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांनी चक्क शाळकरी विद्यार्थ्यांनाच जुंपल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कायम शिक्षकांच्या चुकांवर बोट ठेवणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांचा मतदारसंघ असलेल्या गंगापूर तालुक्यात ढोरेगाव- भोळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात पेंढापूर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत ११० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना शिकवण्यासाठी ६ पुरुष शिक्षक, तर ४ महिला शिक्षक कार्यरत आहेत.
गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथून आणि भोळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून ये – जा करणाऱ्या शिक्षकांना त्रास होतो.शाळेत येण्या-जाण्याच्या मार्गावर खड्डे असल्याची बाब शिक्षकांनी संबंधित विभागाला कळवण्याऐवजी, शाळकरी मुलांना खड्डे बुजवण्यासाठी जुंपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत असून पालकांमधून शिक्षकांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.जिल्हा परिषदेचे शिक्षक कामचुकारपणा करतात. कामाच्या ठिकाणी राहत नाही.
यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला असल्याचं सांगत आमदार प्रशांत बंब सातत्याने शिक्षकांवर टीका करत असतात. याच आमदारांच्या मतदारसंघांमध्ये रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनाच कामाला लावल्याच्या घटनेने रोष व्यक्त केला जात आहे.याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारला असता ते म्हणाले की शिष्यवृत्तीच्या बैठकीसाठी मी गंगापूर येथील बैठकीसाठी आलो होतो. यामुळे खड्डे बुजवण्याच्या प्रकारासंदर्भात मला माहिती नाही. मात्र असं काही असेल तर शिक्षकांना समज दिली जाईल, असं पेंढापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय इंगळे म्हणाले.
  • Related Posts

    कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

    कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन जळगांव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध…

    नंदुरबार जिल्हयात स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्याची उच्च न्यायालयातील ॲड. मनोज सूर्यवंशी यांची मागणी…

    नंदुरबार जिल्हयात स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्याची उच्च न्यायालयातील ॲड. मनोज सूर्यवंशी यांची मागणी…सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्यामार्फत आयोजन करण्यात येत असलेली सेट परीक्षा करिता नंदुरबार जिल्ह्यातून अनेक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

    कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

    नंदुरबार जिल्हयात स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्याची उच्च न्यायालयातील ॲड. मनोज सूर्यवंशी यांची मागणी…

    नंदुरबार जिल्हयात स्वतंत्र सेट परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्याची उच्च न्यायालयातील ॲड. मनोज सूर्यवंशी यांची मागणी…

    धरणगाव – सोनवद बाभुळगाव रस्त्यालगत विट भट्ट्या मालकांनी उडवल्या नियमांची धज्जीया

    धरणगाव – सोनवद बाभुळगाव रस्त्यालगत विट भट्ट्या मालकांनी उडवल्या नियमांची धज्जीया

    रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शाळेतील मुलांना जुंपलं, जिल्हा परिषद शिक्षकांचा कारनामा; पालकांकडून संताप व्यक्त

    रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शाळेतील मुलांना जुंपलं, जिल्हा परिषद शिक्षकांचा कारनामा; पालकांकडून संताप व्यक्त

    चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीलाच संपवले, नंतर अपघाताचा रचला बनाव; असा फसला डाव…

    चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीलाच संपवले, नंतर अपघाताचा रचला बनाव; असा फसला डाव…

    ‘मी पत्नी, मुलगी आणि भाचीला संपवलं…’ रक्ताने माखलेला चाकू घेऊन होमगार्ड पोलीस ठाण्यात पोहोचला

    ‘मी पत्नी, मुलगी आणि भाचीला संपवलं…’ रक्ताने माखलेला चाकू घेऊन होमगार्ड पोलीस ठाण्यात पोहोचला