एक्सपायर झालेल्या तारखा बदलण्याचं काम जीवावर बेतलं,बाटल्यांच्या स्फोटात कुटुंब होरपळलं

रहिवासी संकुलातील इमारतीच्या सदनिकेत अचानक स्फोट झाल्याने इमारतीतील रहिवासी, नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व स्फोटानंतर परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आले.​सदनिकेत परफ्युमच्या बाटल्यांवरील तारखा बदलण्याचे काम सुरू असताना परफ्यूम बाटल्यांमधील गॅसमुळे स्फोट झाल्याची घटना नालासोपारा परिसरात घडली आहे. या स्फोटात सदनिकेत वास्तव्य करणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महावीर वडर (वय ४१) हे त्यांची पत्नी, एक मुलगा, मुलगी अशा परिवारासह नालासोपारा येथील संकेश्वरनगर परिसरातील रोशनी अपार्टमेंट या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील, ११२ क्रमांकाच्या सदनिकेत वास्तव्यास आहेत. वडर त्यांच्या परिवारासह परफ्यूमच्या बाटल्यांवरील तारखा बदलण्याचे काम करीत होते. याच दरम्यान परफ्यूमच्या बाटल्यांमध्ये अचानक भीषण असा स्फोट झाला. एका मागोमाग एक असे दोन ते तीन स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, यामुळे घराच्या काचा देखील फुटल्या. या स्फोटात होरपळून घरातील चारही व्यक्ती जखमी झाले आहेत.

रहिवासी संकुलातील इमारतीच्या सदनिकेत अचानक स्फोट झाल्याने इमारतीतील रहिवासी, नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व स्फोटानंतर परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आले.वडर कुटुंबीय त्यांच्या घरात, परफ्युमवरील संपलेल्या म्हणजेच एक्सपायर झालेल्या तारखा बदलण्याचे काम होत असल्याचे या घटनेवरुन समजते. यावेळी परफ्युमच्या बाटल्यांमध्ये असलेल्या गॅसचा अचानक स्फोट झाला या स्फोटात वडर कुटुंबीय होरपळले गेले. या दुर्घटनेत महावीर वडर (वय ४१ ) पत्नी सुनीता वडर, त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा हर्षवर्धन वडर आणि १४ वर्षांची मुलगी हर्षदा वडर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हर्षवर्धन वडर हा नववर्षाचा मुलगा या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नालासोपारा येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच दुर्घटनेत जखमी अन्य तीन जणांना ऑस्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.