भुसावळ शहर, जे गुन्हेगारीमुळे सतत चर्चेत असते, तेथे आज (१० जानेवारी) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. भुसावळ शहरातील जाम मोहल्ला भागातील हॉटेलमध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घडलीय. तहरीन नजीर शेख (वय ३०) असे मृताचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडालीय.
याबाबत असे की, शहरातील जाम मोहल्ला भागातील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहा या दुकानात हरीन नजीर शेख चहा पिण्यासाठी आला होता. यावेळी तीन ते चार संशयित आरोपींनी आपल्याकडील गावठी पिस्टलातून हरीन शेखवर पाच गोळ्या झाडल्या. या घटनेने दुकानातील ग्राहकांमध्ये पळापळ झाली तर काही क्षणात संशयीत दुचाकीवरून पसार झाले.शरीरातील विविध भागात गोळ्या लागल्याने तेहरीनचा जागीच मृत्यू झाला तर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्यांनी धाव घेतली. चार संशयीतांचा कसून शोध सुरू आहे.दरम्यान भुसावळ शहरात यापूर्वी आफात पटेल नावाच्या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणातील हरीन शेख हा प्रमुख संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. त्यातून ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेज शोधणे तसेच संशयित आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान पुन्हा खून झाल्यामुळे भुसावळ शहरात एकच खळबळ उडाली आहे. खुनाच्या घटनेमुळे भुसावळ शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.