दुचाकीवर रॉडने मारहाण, भररस्त्यात सव्वा कोटींची रक्कम लुटली; हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी

 वाशिममध्ये भररस्त्यात दुचाकीवरुन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करत त्यांच्याकडीव सव्वा कोटींची रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या दोन कामगारांवर चोरट्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांकडून १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम जबर मारहाण करून लुटली असल्याची घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला नांदेड महामार्गावरील हिंगोली नाक्या समोरील उड्डाण पुलावर गुरुवारी ५ वाजून ४० मिनिटांच्या दरम्यान घडली आहे.वाशिम शहरातील खाजगी व्यापाऱ्याकडे काम करणारे २ कर्मचारी बँकेतून रक्कम काढून दुचाकीवरून बाजार समितीत निघाले होते. त्यावेळी काही अज्ञात चोरट्यांनी मागून दुचाकीवरुन येऊन दोघांना रॉडने मारहाण केली. मारहाण करत त्यांच्याकडील १ कोटी २० लाख रुपयांची रोकड लुटल्याच्या धक्कादायक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही रक्कम विठ्ठल सोयाबीन मार्केटमधील एका व्यापाऱ्याची असल्याचं समोर आलं आहे.
वाशीम शहरालगत अकोला नांदेड महामार्गावर बाहेती यांची खाजगी कृषी बाजार समिती असून तेथे शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जातो. याठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होत असते. खरेदी केलेल्या शेती मालाचे पैसे देण्यासाठी बँकेतून बाहेती यांचे कर्मचारी ज्ञानेश्वर बयस आणि विठ्ठल हजारे हे नेहमी प्रमाणे बाहेती मार्केटकडे निघालेले. त्यावेळी रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी रॉडने मारून कामगार विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बयस या दोघांना गाडीवरून खाली पाडलं आणि त्यांना जबर मारहाण करून त्यांच्या जवळ असलेली पैशांची बॅग हिसकावून घेत घटनास्थळावरून पोबारा केला.या घटनेत दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी लावून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. पोलिसांनी या लुटीचा तपास करताना चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तयार केली आहेत. या प्रकरणाची परिसरात चर्चा असून भीती व्यक्त केली जात आहे.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.