खेळता खेळता अनर्थ घडला, मित्रांची मस्ती चिमुकलीच्या जीवावर बेतली, तरुण अंगावर पडल्यानं २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू,

 जुहूत दोन वर्षाच्या चिमुकलीवर एक विद्यार्थी त्याचा तोल गेल्याने पडला. मात्र यात चिमुकली गंभीर जखमी झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.जुहूमधून अतिशय हैराण करणारी बातमी समोर आली आहे. कॉलेजमध्ये शिकणारा एक विद्यार्थी त्याच्या मित्रासोबत मस्ती करत असताना त्याचा तोल गेला. तोल गेल्याने तो बाजूला खेळत असलेल्या दोन वर्षांच्या मुलीच्या अंगावर पडला. यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. २ जानेवारी रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
२ जानेवारी रोजी विधी अग्रहरि नावाची दोन वर्षांची चिमुकली त्यांच्या दुकानाजवळ खेळत होती. त्यांच्या दुकानाजवळ तिथेच हर्षद गौरव नावाचा विद्यार्थी आपल्या शाहनवाद अन्सारी या मित्रासोबत गप्पा मारत होता. दोघांची एकमेकांसोबत मस्ती सुरू होती. त्यांची मस्ती सुरू असताना विधी अग्रहरि या मुलीच्या आईने दोन्ही कॉलेजच्या त्या मुलांना आपल्या मुलीच्या इतक्या जवळ, इथेच खेळू नका, दुसरीकडे खेळा असं सांगितलं, पण त्या दोघांनीही ऐकलं नाही.दुकानाजवळ चिमुकली खेळत होती, तिथेच दुकानाजवळ त्या दोन विद्यार्थ्यांची मस्ती सुरू होती. दोघं हसत-खेळत बोलत होते, मस्तीमध्ये एकमेकांना धक्का देत होते. तेवढ्यात २० वर्षीय हर्षद नावाच्या विद्यार्थ्याचा तोल गेला आणि तो बाजूला खेळत असलेल्या चिमुकल्या विधीवर पडला.
हर्षद तिच्यावर पडल्याने विधी जमिनीवर कोसळली, तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिच्या आई-वडिलांनी तात्काळ तिला कूपर रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात मुलीवर दोन दिवस उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान ४ जानेवारी रोजी चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.विधीच्या आई-वडिलांनी हर्षदच्या बेजबाबदारपणामुळे आपल्या लेकीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. चिमुकलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याआधारे विद्यार्थ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा, जुहू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.