तुम्हाला काय एक फोन कॉल आणि प्रॉब्लेम सॉल ना, आमच एक फाईट वातावरण टाईट, निलेश राणे यांच्या भाषणाची चर्चा.

आमदार निलेश राणे यांनी किरण सामंत यांच्या कन्या अपूर्वा सामंत यांच्या कार्याचं विशेष कौतुक केले. आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राणे यांनी सामंत यांच्या कामाचंही कौतुक केलं आणि आगामी गोष्टींबद्दलही मोठे भाष्य केले.सामंत साहेब हे सगळं तुमच्याकडून होणार नाही. तुम्ही माझ्याकडे पाठवायचे बाकीचे उद्योगधंदे तुमच्याकडून होणार नाहीत ते माझ्याकडे आहेत. तुमचं काम म्हणजे तुम्हाला काय एक फोन कॉल आणि प्रॉब्लेम सॉल ना, आमच एक फाईट वातावरण टाईटआम्हाला त्याच्यासाठीच ऑफर असल्याचे ही आमदार निलेश राणे मिश्किल शैलीत सांगितले. अपूर्वा सामंत किंगमेकर आहेत, आमदार किरण सामंत याच्या विजयात अपूर्वाचा मोठा वाटा आहे, असं सांगत राजापूरचे आमदार किरण सामंत यांची सुकन्या अपूर्वा सामंत हीच कौतुक केले. किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम सोहळ्याला निलेश राणे यांनी खास उपस्थित लावत सामंत यांच्या कामाचं कौतुक केले.

आमदार किरण सामंत याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजापूर येथील जिल्हा परिषद गट सागवे हा संपूर्णच्या संपूर्ण गट आमदार किरण सामंत याच्या नेतृत्वाखाली उबाठामधून शिंदे शिवसेनेत आला. त्यामुळे शिवसेनेचे कोकणातील आगामी राजकारण सामंत व राणे हे मिळून करणार असल्याचेही स्पष्ट संकेत देत आमच्यामध्ये कोणतेही वाद नाहीत असेच स्पष्ट संकेत या कार्यक्रमातून आमदार निलेश राणे यांनी दिली आहेत. कोकणातील शिवसेनेच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तीन शिलेदार संघटनेच्या बांधणीत लक्ष घालणार आहेत. यामध्ये शिवसेनेचे युवा नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम आमदार निलेश राणे किरण सामंत या नेत्यांची युवा टीम सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे.लोकांच्या लोकप्रतिनिधीकडून ज्या मागण्या आहेत ना त्या सगळ्या सभागृहातून आणि सभागृहाच्या बाहेरून सुद्धा मागणी पूर्ण का झाली नाही याचा जाब विचारण्यासाठी तुम्ही आमच्या सारख्या लोकांना सभागृहात पाठवला ना साहेब सामंत साहेब हे सगळं तुमच्याकडून होणार नाही. तुम्ही माझ्याकडे पाठवायचे बाकीचे उद्योगधंदे तुमच्याकडून होणार नाहीत ते माझ्याकडे आहेत. तुमचं तुम्हाला काय एक फोन कॉल आणि प्रॉब्लेम सॉल ना, आमच एक फाईट वातावरण टाईट आम्हाला त्याच्यासाठीच ऑफर असल्याचे ही आमदार निलेश राणे यांनी सांगितले.यावेळी त्यांनी आमदार किरण सामंत यांची कन्या अपूर्वा सामंत याचे तोंड भरून कौतुक केले. माझ्या वडिलांच्या पाठीमागे मी त्याच्यासाठी काम केले नाही केले तरी लोकांनी मला किंगमेकर कधीच म्हटले नाही.आमदार किरण सामंत याच्या विजयात अपूर्वा सामंत याचे खूप मोठे योगदान असून लोक तिलाच किंगमेकर म्हणत असल्याचे ही आमदार निलेश राणे यांनी व्यासपीठारून सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या किरण सामंत यांच्या सुकन्या अपूर्वा सामंत यांच्या कामाची दखल घेत निलेश राणे यांनी खास कौतुक केले. या वयात अपूर्वाला जे स्टेज डेरींग आहे. त्या वयात आम्हाला ही नव्हते. आम्ही कुठे तरी पाठी मागे जाऊन उभे राहत होतो. या पक्ष प्रवेशाच्या वेळी बोलताना आमदार निलेश राणे यांनी सांगितले की ,किरण सामंत यांना निवडून आणण्यामागे अपूर्वा सामंत यांचे फार मोठे योगदान असून अपूर्ण सामंत या किंगमेकर झालेल्या आहेत.आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, त्यांनी तुम्हाला निवडून आणण्यामध्ये जे काही केले आहे ना काम ते तुम्हाला कोणी डायरेक्ट सांगणार नाही. आम्ही आजूबाजूला जे काही ऐकतो ऐकून होतो ना अपूर्वा मनापासून तुझं कौतुक आहे. तू खूप मोठी हो आणि होणारच आहेस आणि तुला कोणी थांबवू शकत नाही. एवढं काम या वयामध्ये, तुझ्या वयाचा आम्ही होतो ना तेव्हा स्टेजवर जायचं नाही आम्ही कुठेतरी मागे उभे असायचो काही कळायचं नाही बाळासाहेब कधी दौरे काढायचे शंभर दोनशे गाड्या निघायच्या आम्ही कुठेतरी 120 व्या गाड्यामध्ये असायचो पण तू या वयामध्ये हे जे सगळं काही कॅप्चर केलस जे स्वतःला सिद्ध केले आहेस त्याचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे.सामंत साहेब तुम्हाला सांगतो मला माहिती नाही माझ्या वडिलांना काय मागे काय म्हणतात निलेशने तुमच्यासाठी असं केलं निलेशने तुमच्यासाठी तसं केलं पण कधी मला कोणी माझ्या वडिलांचा किंग मेकर कोणी सांगितला नाही. तुमची मुलगी तुमच्यासाठी किंग मेकर आहे. तिने तुमच्यासाठी एवढे मोठे चित्र उभं केलं खरोखरच तिचं मनापासून कौतुक असल्याचे ही आमदार निलेश राणे यांनी सांगितले. दरम्यान यावेळी आमदार निलेश राणे यांचे जोरदार भाषण आणि भाषणातील फटकेबाजी व सावंत यांच्या कौतुकाबरोबरच अपूर्वा सामंत यांचे कौतुक या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण झाले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.