मध्यरात्री गोळीबाराच्या घटनेने चाळीसगाव हादरले; संशियत CCTV कॅमेऱ्यात कैद..

जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव शहरात मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. चाळीसगाव शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून हवेत गोळीबार केला. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून गोळीबार करून संशयित आरोपी हे फरार होताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. दरम्यान याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील पोतदार हायस्कूल जवळील सारंग अशोक बेलदार (वय ४९) यांच्या घरासमोर तीन दुचाकींवर सहा जण आले आणि यातील बुलेट मोटारसायकलवर मागे बसलेल्या एकान हवेत गोळीबार करून सारंग बेलदार याच्या घराच्या पार्चमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर दगड टाकून नुकसान केलं. तसेच शिवीगाळ करत दुचाकीवरून पसार झाले. हा गोळीबार जुन्या वादातून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गोळीबार करताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहे. गोळीबार करून संशयित आरोपी हे फरार होताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दुसरीकडे पोलीसांनी संशयित आलेल्या संकेत उर्फ बाळू मोरे रा. हनुमान वाडी चाळीसगाव याच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरातून ६ जिवंत काडतूस, पिस्टल मॅगझीन, कोयता, गुप्ती, स्टील रॉड आणि बेसबॉल खेळण्याची लाकडी बॅट असा घातक हत्यारे मिळून आले आहे. या संदर्भात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी हे करीत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.