माजी उपनगराध्यक्षाने उचललं टोकाचं पाऊल; वाहनामध्ये बसून विष प्राशन, स्वप्निल निखाडेंचा उपचारादरम्यान मृत्यू

सन 2016 च्या कोपरगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वप्निल निखाडे प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर कोल्हे कुटुंबियांनी निखाडे यांना कमी वयातच उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली. कमी वयातच उपनगराध्यक्ष पदी विराजमान झालेले निखाडे कोपरगावात अनेकांना परिचित होते. कोपरगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी मंगळवारी सात जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास आपल्या वाहनामध्ये बसून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी त्यांना कोपरगाव शहरातील मुळे हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले. डॉक्टर मुळे यांनी प्राथमिक उपचार केले परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संजिवनीच्या रुग्णवाहिकेतून नाशिकच्या नाईन पल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी कोल्हे यांच्या यंत्रणेतील कर्मचारी तसेच काळे आणि कोल्हे दोन्ही गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

सन 2016 च्या कोपरगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वप्निल निखाडे प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर कोल्हे कुटुंबियांनी निखाडे यांना कमी वयातच उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली. कमी वयातच उपनगराध्यक्ष पदी विराजमान झालेले निखाडे कोपरगावात अनेकांना परिचित होते. त्यानंतरच्या काळात त्यांनी कोल्हे कुटुंबाची साथ सोडत आमदार आशुतोष काळे यांच्या काळे गटात प्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधले होते. विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांना विजयी करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी प्रचार केला. स्वप्निल निखाडे यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या का केली? या संदर्भात शहरात विविध प्रकारच्या चर्चा सुरू असून अधिकृत कारण मात्र समजू शकले नाही. स्वप्निल निखाडे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या जाण्याने कोपरगाव शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.