मुन्नीबद्दल आमदार सुरेश धस यांचा परत मोठा खुलासा, म्हणाले, ती महिला…

सुरेश धस यांनी संतोश देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि अनेक गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीतील ‘मुन्नी’ वरून त्यांनी केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली रंगली. आता परत त्यांनी मुन्नीबद्दल एक मोठा खुलासा केलाय.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. सातत्याने अनेक गंभीर आरोप केली जात आहेत. हेच नाहीतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून केली जातंय. संतोश देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक ठिकाणी मोर्चाचे आयोजन केले जात आहे. सुरेश धस यांच्याकडून गंभीर आरोप करत मोठे खुलासे केली जात आहेत. दुसरीकडे ओबीसी समाज हा सुरेश धस यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक झालाय. अनेक ठिकाणी सुरेश धस यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हे दाखल केली जात आहेत.

काल सुरेश धस यांनी म्हटले होते की, राष्ट्रवादीमध्ये एक मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा तू इथे ये. कुठे मिटकरी, सुरज चव्हाण या लहान पोरांना बोलायला लावते. मला माहितीये आणि मुन्नीला पण माहितीये मी कोणाबद्दल बोलत आहे. सुरेश धस यांच्या या विधानानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. अखेर राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण?. यावर चर्चा रंगताना दिसली.आता सुरेश धस यांनी याबद्दल भाष्य केले. सुरेश धस हे म्हणाले की, मी काल ज्या मुन्नीबद्दल बोललो ती कोणीही महिला नसून तो पुरूष आहे. सुरेश धस यांच्या विधानानंतर सर्वांना वाटले की, ते एका महिलेबद्दल बोलत आहेत. मात्र, त्यांच्याकडून आता स्पष्ट करण्यात आले की, ती महिला नाही. मग सुरेश धस नेमके कोणाबद्दल बोलत आहेत, याची चर्चा होताना दिसत आहे.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस हे सातत्याने गंभीर आरोप करताना दिसत आहेत. आज झालेल्या पैठण येथील मोर्चात ते बोलताना दिसले. सुरेश धस यांच्या निशाण्यावर धनंजय मुंडे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले होते की, मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचे गांभीर्य कमी झाले. सुरेश धस या हत्येचे फक्त राजकारण करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.