आंध्रप्रदेशातील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ४ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. आंध्रप्रदेशातील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ४ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. तिरुपती मंदिरातील वैकुंठ द्वार तिकीट काऊंटरवर टोकन घेण्यासाठी गर्दी उसळली असता ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्यांना श्री व्यंकटेश्वर रामनारायण रुईया शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
वास्तविक, वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने तिरुमला तिरुपती देवस्थान म्हणजेच TTD तिरुमला येथील भाविकांना दहा दिवसांसाठी वैकुंठ द्वार दर्शन देणार आहे. १० जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत दर्शन घेता येणार आहे. ९ जानेवारीला पहाटे ५ वाजल्यापासून या गेटवरून दर्शन टोकन दिले जाणार आहे. हे एसएसडी टोकन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती. TTD ने तिरुपती आणि तिरुमला येथे SSD टोकन वितरित करण्यासाठी काउंटर उभारले आहेत. दरम्यान, ९ जानेवारीला सकाळी ५ वाजता या केंद्रांवर १०, ११ आणि १२ तारखेसाठी १ लाख २० हजार टोकन वितरित केले जाणार आहेत. पण त्याआधीच भक्तांनी केलेल्या अलोट गर्दीमुळे ही घटना घडली परंतु आता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणली आहे.मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भाविकांचा मृत्यू झाल्याने तीव्र शोक व्यक्त केला आहे.










