लाच घेताना तलाठ्यासह दोन खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. जळगावमधील कुसुंबा येथील तलाठ्यास तीन हजार रुपयाची लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असताना आता मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथे तलाठ्यासह दोन खाजगी पंटरला ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज बुधवार, ८ जानेवारी रोजी सापळा रचून केली असून यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली. प्रशांत प्रल्हाद ढमाळे लाचखोर तलाठ्याचं नाव आहे.

तक्रारदार, जळगाव शहरातील रहिवासी असून मुक्ताईनगर तालुक्यातील कोरा गावात त्यांचे मूळ गाव आहे. त्यांचे आजोबा १९७७ मध्ये मयत झाले होते, पण तेव्हापासून त्यांच्या वडील, काका, आत्या व मयत काकांच्या मुलांचे नावे ७/१२ उताऱ्यावर लावलेले नव्हते. गेल्या ७ ते ८ दिवसांपूर्वी तक्रारदाराने कुऱ्हा गावातील तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे यांच्याशी भेट घेऊन या संदर्भात माहिती सांगितली.तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे यांनी सांगितले की, प्रत्येक वर्षाचे २२० रुपये प्रमाणे ६ हजार रुपये शासकीय फी भरावी लागेल, जर तुम्हाला शासकीय फी भरायची नसेल तर मला ५ हजार रुपये द्यावे लागतील. या मागणीनंतर तक्रारदाराने जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचून तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे व त्याचे दोन खाजगी पंटर अरुण शालिग्राम भोलानकार व संतोष प्रकाश उबरकर यांना रंगेहाथ पकडले.या कारवाईमुळे मुक्ताईनगर तसेच महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई लाचखोरी विरुद्ध कठोर कारवाईच्या दिशेने एक महत्त्वपूर्णपाऊल आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.