रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला भरधाव वाहनाची धडक, पादचाऱ्याचा जागीच करुण अंत

 धडक दिलेले वाहन घटनास्थळावरून निघून गेले. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस व वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा उपकेंद्रात पाठवून दिला.पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर कोल्हापूर नाका येथे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात पादचारी जागीच ठार झाला. मंगळवारी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे- बंगळुरू आशियाई महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे.
त्यामुळे येथील वाहतूक सर्व्हिस रस्त्याने सुरू आहे. मंगळवारी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुणे – बंगळुरू महामार्गावरील कराड ते सातारा या लेनवर रस्ता ओलांडताना पादचाऱ्यास अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.धडक दिलेले वाहन घटनास्थळावरून निघून गेले. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस व वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा उपकेंद्रात पाठवून दिला. दरम्यान, कोल्हापूर नाक्यावर झालेल्या अपघातानंतर येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अज्ञात वाहनाचा शोधदेखील घेतला जात आहे.
  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.