चालकाचं नियंत्रण सुटलं, ट्रॅक्स २०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात; ठाण्यातील हृदयद्रावक घटना

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने जखमींना सुरुवातीला कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले, मात्र जखमी पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यासह इतर २ जणांवर खर्डी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान चालक सुरेश ठोंबरे यांच्यासह झुगरे कुटुंबातील ७ जण जखमी झाले. चालकाचं प्रवाशी वाहन असलेल्या जीप वरून नियंत्रण सुटल्याने प्रवाशी वाहन चालकासह २०० फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १ प्रवासी ठार झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील पालघर मार्गावरील असलेल्या विहीगाव खोडाळा गावाच्या हद्दीतील अप्पर वैतरणा धरणाच्या लगत असलेल्या दरीत घडली आहे. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अपघाताच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दादू जेठू झुगरे (वय ६९, रा. माळ गावठा, शहापूर तालुका) असं अपघातात ठार झालेल्या प्रवाशाचं नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार. मृतक दादू जेठू झुगरे हे रेल्वे सेवेतून सेवा निवृत्त कर्मचारी होते. ते कुटूंबासह शहापूर तालुक्यातील कसारा भागात असलेल्या माळ गावठा राहत होते मृतक दादू हे काल ७ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील खोड गावात आपल्या मूळ गावी कुटूंबासह प्रवासी जीपने निघाले असतानाच कसारा भागातील विहिगावजवळील वळणादार रस्त्यावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट २०० फूट खोल दरीत कोसळली. खळबळजनक बाब म्हणजे अपघाताच्या स्थळावर खालच्या बाजूला अप्पर वैतरणा धरणाच्या काठावर असलेल्या खडकावर जाऊन प्रवाशी वाहन आदळले.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने जखमींना सुरुवातीला कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले, मात्र जखमी पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यासह इतर २ जणांवर खर्डी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान चालक सुरेश ठोंबरे यांच्यासह झुगरे कुटुंबातील ७ जण जखमी झाले. त्यामध्ये सन्या ठाकरे, भारती झुगरे, उषा झुगरे, अती झुगरे, अंकिता झुगरे, आदित्य झुगरे, पातळी झुगरे अशी जखमींची नावे आहे. या घटनेची माहिती मिळताच शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, नायब तहसीलदार वसंत चौधरी, पोलीस निरीक्षक सुरेश गावित, पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी तसेच घटनस्थळाचा पंचनामा करीत पोलीस तपास सुरू केला आहे.
  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.