धनंजय मुंडेंना धक्का, करूणा शर्मांचा मोठा निर्णय, काय घडलं?

मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आमदार सुरेश धस दिवसेंदिवस नवनवीन खळबळजनक आरोप करत आहेत. अशातच करूणा शर्मांनीही मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते.केज तालुक्यामधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण आक्रमकपणे लावून धरलं आहे. सातपुडाा बंगल्यावर धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत खंडणीची बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. राज्यभर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चे निघत असल्याने आता मुंडेंचं मत्रिपदही धोक्यात आलं आहे. अशातच करूणा मुंडे यांनी मोठा निर्णय घेतल्याने धनुभाऊंची अडचण झाली आहे.


मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा शर्मा-मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या  छत्रपती संभाजी नगर  खंडपीठात निवडणूक याचिका सादर केली आहे. धनंजय मुंडे यांनी गैरमार्गाने निवडणूक जिंकल्याचा व इतर आरोप त्यांनी केले आहेत. या निवडणूक याचिकेचा स्टॅम्प क्रमांक ५०९/२०२५ आहे, अशी माहिती ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांनी दिली आहे.करुणा शर्मा-मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज ३० ऑक्टोबर रोजी फेटाळला होता. मात्र, धनंजय मुंडे आणि इतरांचे अर्ज मंजूर केले होते. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २३ नोव्हेंबर रोजी घोषित केले होते. त्यानंतर करुणा मुंडे यांनी ४ जानेवारी २०२४ रोजी खंडपीठात निवडणूक याचिका सादर केली आहे.आपण स्वतः १९९६ साली कायदेशीर लग्न झालेली पत्नी असताना धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन अपत्यांचा उल्लेख केला. मात्र, पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची माहिती दडवली आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान केंद्र ताब्यात घेतले. मतदान केंद्रांवर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावू दिले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना मतदान केंद्रावर प्रवेश करू दिला नाही. त्यांना मारहाण करून धमक्या दिल्या. तसेच ॲड. माधव जाधव यांना मारहाण केली. मुंडे यांनी गैरमार्गाने निवडणूक जिंकली, असे आरोप याचिकेत केले आहेत. करुणा शर्मा यांच्या वतीने ॲड. चंद्रकांत ठोंबरे काम पाहत आहेत. ॲड. ज्योती सदावर्ते यांनी सहकार्य केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.