पुण्यात आयटी कंपनीतील २८ वर्षीय तरुणीला पार्किंगमध्ये संपवलं, मित्राला बेड्या, चक्रावणारं कारण

शुभदाने कृष्णाकडून काही रक्कम उसनी घेतली होती. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने दोघांच्यात वाद झाले होतेविमाननगर येथील डब्ल्यूएनएस आयटी कंपनीत लेखापाल म्हणून काम करणाऱ्या मित्राने मैत्रिणीवर धारदार चाकूने वार करून खून केला. ही घटना सोमवारी सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज, पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय ३०, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर, कात्रज, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. शुभदा आणि कृष्णा एकाच कंपनीत लेखापाल म्हणून नोकरीला होते.शुभदाने कृष्णाकडून काही रक्कम उसनी घेतली होती. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने दोघांच्यात वाद झाले होते. सोमवारी सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांच्यात पुन्हा वाद झाले. यातून कृष्णाने धारदार चाकूने शुभदावर वार केले.

सुरक्षारक्षकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले.दरम्यान, आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर तरुणाने वार केल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. शुभदा कोदरे आणि आरोपी कृष्णा कानोजा हे एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते. दरम्यान कृष्णाने शुभदाच्या उजव्या कोपऱ्यावर धारदार शस्त्राने वार केला. यावेळी मोठा गोंधळ उडाला. जखमी अवस्थेतच शुभदाला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.दुसरीकडे, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात धरणगाव ते धुपेश्वर मार्गावर एका शेतामध्ये तृतीयपंथीयाची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मृत तृतीयपंथी २५ ते २८ वर्षे वयोगटातील आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मलकापुरातील फातेमानगरमध्ये वास्तव्यास असलेल्या काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.गळा आवळून खून झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्याच्या डोक्यावर व मानेवर मारहाणीच्याही खुणा आहेत. अद्याप त्याची ओळख पटली नाही. त्याची हत्या कोणी व का केली, याचा तपास सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे तसेच अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक,  तज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅबची टीमदेखील घटनास्थळी पोहोचली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.