एक बॉयफ्रेंड भर रस्त्यात सगळ्यांसमोर आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानं या मुलीला रस्त्यावर लोळवलं आणि तिची मान तोडत होता. पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही देखील शॉक्ड व्हाल. व्हिडीओ होतोय व्हायरल.प्रेमात सर्वकाही माफ असतं असं म्हणतात. पण काही लोक या म्हणीचा अर्थ फारच चुकीच्या पद्धतीनं घेतात. ही मंडळी प्रेमात इतकी वेडी होतात की समोरच्या व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायला देखील ते मागेपुढे पाहात नाहीत. अन् असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणानं भर चौकात गर्लफ्रेंडचा गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानं तिच्या गळ्यावर ओढणी बाधली आणि तिला रस्त्यावर झोपवून तिची मान तोडत होता. पुढे या तरुणीचं काय झालं हे आता तुम्हीच पाहा. हा थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या तरुणाचं नाव राहुल असं आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील अमरोह या ठिकाणी घडली आहे. तर त्याचं घडलं असं की, राहुल आणि ती मुलगी दोघं गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण राहुलचा स्वभाव हा संशयी आहे. ती मुलगी आणखी काही मुलांसोबत फिरत असल्याचा त्याला संशय होता. त्यामुळे त्यानं वर्गमित्रांसोबतही बोलण्यास तिला बंदी घातली होती. परिणामी अर्थातच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावल्यामुळे हे नातं ब्रेकअप पर्यंत पोहोचलं. पण मुलाला हे मान्य नव्हतं. त्यामुळे रागाच्या भरात बदला घेण्यासाठी त्यानं तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो भर रस्त्यात तिचा जीव घेत होता.या मुलानं तिची ओढणी गळ्याभोवती गुंडाळली आणि तिला रस्त्यावर लोळवून तिचा गळा आवळत होता. लवकरात लवकर तिचा प्राण जावा यासाठी त्यानं तिचे पाय सुद्धा घट्ट पकडून ठेवले होते. पण सुदैवानं कॉलेजच्या काही मुली घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी या मुलीला राहुलच्या तावडीतून सोडवलं.मीडिया रिपोर्टनुसार या मुलाविरोधात अधिकृत पोलीस तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्याला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान ही घटना आसपासच्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि आता हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. असो, तुम्हाला काय वाटतं या मुलाविरोधात कुठली कारवाई केली पाहिजे? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या.










