खंडणी प्रकरणाचा गेम फिरला? पुण्यातील कुख्यात गुंड घायवळसोबत धसांचे संबंध, बिक्कडने फोडला मोठा बॉम्ब.

 पुण्यातील जनआक्रोश मोर्चामध्ये आमदारा सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर खंडणीची बैठक झाल्याचा आरोप केला. बैठकीला उपस्थित असलेल्यांची नावे जाहीरपणे घेतली होतीत. अशातच या आरोपानंतर यामधील नितीन बिक्कड याने मोठा दावा केला आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत पुण्यातील जनआक्रोश मोर्चामध्ये आमदार सुरेश धस यांनी बोलताना खळबळजनक दावा केला होता. मंत्री धनंजय मुंडे यांच्या ‘सातपुडा’ या शासकीय निवासस्थानावर खंडणीची बैठक झाल्याचा दावा केला होता. या बैठकीला धाराशिवमधील नितीन बिक्कडचे नाव घेतले होते. आता नितीन बिक्कड याने माध्यमांसमोर येत अशा बैठकीला उपस्थित नसल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच धस यांचे पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळसोबतच्या कनेक्शनबाबत मोठा दावा केला आहे.या खंडणी प्रकरणामध्ये माझा कसलाही संबंध नाही. राष्ट्रवादी एकत्र असताना मी प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करत होतो. आता शरद पवार गटामध्ये आता युवक प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. मी जर त्या डीलिंगमध्ये असतो तर कंपनीने नाव घेतलं असतं. मी गावाकडे नसताना निलेश घायवळ चार गाड्या घेऊन वडिलांना धमकी दिली होती. वडिलांनी एनसी नोंदवली होती पण गुन्हा नोंदवून घेतला नव्हता. घायवळ आणि धस यांचे संबंध आहे हे धाराशिव आणि बीड जिल्ह्याला माहित आहे. सर्वात मोठा पवनचक्की माफिया कोण आहे? कोण कुठे खंडणी घेते, कोणाला मारहाण केली जाते याबद्दल जिल्ह्यातील प्रत्येकाला माहितीय. सुरेश धस यांनी विचार केला पाहिजे या प्रकरणामध्ये आपण स्वत: असताना दुसऱ्यांची नाव का घेता? पाटोदा तालुक्यात सर्वात मोठी खंडणी पाटोदा भागामध्ये कोणी-कोणी घेतली हे सर्वांना माहित आहे. माझ्याकडे दोन कंपन्यांचा वेंडर असून तिथे काम करत असल्याचं नितीन बिक्कडने सांगितलं.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.