यावल शहरातील श्रीराम नगरात जुगार अड्ड्यावर छापा , दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर
यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या श्रीराम नगरात जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत सहा हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
दोघांविरोधात गुन्हा दाखल यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या श्रीराम नगरात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई चे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, सहाय्यक फौजदार अस्लम खान, हवालदार वासुदेव मराठे, राजेंद्र पवार, वसीम तडवी, सुशील घुमे,आदीच्या पथकाने जुगार अड्ड्यावर वरून एक हजार ७५० रुपयाची रोख रक्कम तसेच विविध साहित्य अस सहा हजार ७५० रुपयांचा मुद्दे माल जप्त केला . तर संशयीत पसार झाले . याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवालदार मोहन तायडे यांच्या फिर्यादीवरून आर्यन अशोक बोरेकर व सिद्धार्थ अशोक बोरेकर दोन्ही रा. श्रीराम नगर याच्या विरुद्ध मुबंई जुगार कलम कायदा १२ अ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहेत .









