समृद्धी महामार्गावर 2 कारचा भीषण अपघातात चक्काचूर,6 जणांचा जागीच मृत्यू

जालना : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जालन्यातली कडवंची गावाजवळ दोन गाड्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

तसेच 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, चारजण जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नागपूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या कारला राँग साईडने येणाऱ्या कारची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला.
जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी अकराच्या सुमारास नागपूरवरून मुंबईकडे जाणारी आर्टिका आणि राँग साईडनं येणाऱ्या स्विफ्ट डिझायरची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला.
अपघाताची माहिती कळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत जखमींना ॲम्बुलन्समधून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले. यावेळी रस्त्याच्या कडेला पडलेल्या आर्टिका गाडीला क्रेनच्या सहाय्यानं काढण्यात आला. अपघातातील चारपैकी तिघांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रेफर करण्यात आले आहे.
नेमका कसा झाला अपघात?
समृद्धी महामार्गावर जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन गाड्यांची जोरदार टक्कर झाली. या अपघातात आर्टिका गाडी जी नागपूरवरून मुंबईला जात होती. या गाडीची राँग साईडनं येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीवर जोरदार धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, आर्टिका गाडी ही या महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून रस्त्याच्या 4 ते 5 फूट खाली कोसळली. या अपघातात दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.