थोरगव्हाण ता रावेर डी.एस देशमुख माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात येथ सांस्कृतिक समिती तर्फे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 03 जानेवारी शुकवार रोजी सन्माननिय सुरेश बाळकृष्ण महाजन (नाले) सेवानिवृत्त एच डीओ तथा सामाजिक कर्यकर्ता खरगोन यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला .प्रमुख पाहुणे व बहुसंख्येने उपस्थित विद्यार्थी यांचे मुळे शारदेचे प्रांगण फुलले होते . इशस्तवन सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू व स्वागत सजा दो ज्ञान मंदिर को या गीताने आनंद व उत्साहात मधुर गीत गायनातून सप्तसुरांचे रंग भरले व मान्यवरांची बक्षिस रूपाने दाद मिळवली .प्रथम सरस्वती , सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष सुरेश महाजन व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती प्रमुख पी सी कचरे यांनी केले . सावित्रीबाई जयंती निमित्त दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण स्थापना (1917 ) यांचे तर्फे विद्यालयात 15 कर्तुत्ववान माहिलांचा स्मृतीचिन्ह शॉल श्रीफळ देवून सन्मान झाला . रजनीताई पाटील संचालिका , रेखा तायडे सरपंच थोरगव्हाण , उज्वला बाऊस्कर ग्रामपंचायत सदस्या थोरगव्हाण, सिंधुबाई पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापीका , चित्रा तायडे विद्यमान मुखाध्यापीका जि प शाळा थोरगव्हाण , वैशाली चौधरी थोराव्हाण ( ह .मु .मुंबई ) , रूपाली राजू कोलते ग्रामपंचायत सदस्या लहान वाघोदा , सिंधुबाई गंगाधर सपकाळे उपसरपंच चनवाडे , सविता सदाशिव झांबरे अंगणवाडी सेविका भगिनी गाते , सारिका पाटील सरपंच गाते , पुनम इश्वर कोळी समाजसेविका मांगी , संगिताबाई तायडे सरपंच गहूखेडा , वत्सलाबाई चौधरी उपसरपंच गहूखेडा , रूपाली कोळी पंचायत समिती सदस्या रणगांव , विदया सपकाळे सुदगांव आशा वर्कर भगिनी अशा अलौकिक कार्याची दखल घेत संस्थेने 15 सावित्रींच्या लेकींचा सन्मान विद्यालयातील शिक्षिका जयश्री चौधरी , नयना पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाला . कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश महाजन व पारितोषिक वितरक जगदिश महाजन सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता , जलसंपदा विभाग नाशिक , हेमंत चोधरी सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता जि प नाशिक , पी डी पाटील सेवानिवृत्त लेखा परीक्षक सहकारी संस्था यावल तालुका ऑडीटर , नितिन चौधरी मॅनेजर टेक्निकल ऑपरेशन इंडिया गव्हर्नमेंट मिंन्ट मुंबई , हेमंत पाटील उपसरपंच वेल्हाळा ता भुसावळ यांनी एच एस सी व एस एस सी प्रथम आलेले विद्यार्थी प्रत्येक विषयानुसार प्रथम आलेले सह शालेय उपक्रमातील विद्यार्थी यांना दात्यांनी उदार अंतःकरणाने ठेवलेल्या ठेवीवरील व्याज तसेच रोख पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले .

सर्व देणगीदार यादीचे वाचन संस्था शाळे तर्फे मुख्याध्यापक एस एस वैष्णव यांनी केले व दात्यांचे आभार मानले शुभेच्छा दिल्या . समिती कडून एच . एस .सी .पात्र दाते व विद्यार्थ्यांची नावे पी सी कचरे यांनी वाचन केले , एस .एस . सी . यादीतील नावे एम के पाटील तर सहशालेय यादीतील नावे एन बी चौधरी यांनी वाचन केले .सावित्रीबाई दत्तक O4 विद्यार्थीनी यांना शालेय गणवेश देण्यात आले . गेल्या पंधरा वर्षा पासून विद्यालयात होतकरू व शिक्षणाची जिज्ञासा असणाऱ्या कमी उत्पन्न असलेल्या गरजू 11 (अकरा ) विद्यार्थीनींना शालेय गणवेश भुसावळ येथिल जेष्ठ नागरीक संघाचे विजय मांडळकर , मिलिंद मांडळकर यांनी आई स्वर्गीय नलिनी विजय मांडळकर यांचे स्मरणार्थ मिलिंद मांडळकर यांनी विद्यालयात शालेय गणवेश पात्र विद्यार्थीनींना वाटप केले . राजु सपकाळे यांचा शाळे तर्फे सत्कार झाला .सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ठ सांघिक नृत्य मुलींली सादर केले .कौतुकपर मान्यवरांनी मोठे बक्षिस देवून विद्यार्थीनिंना प्रेरणा दिली व कौतुक केले .संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी , उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव पवन चौधरी, संचालक कमलाकर चौधरी, मधुकर कोल्हे, नंदकुमार चौधरी, चंद्रकात पाटील, रविंद्र चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली .सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्याची माहिती जयंती निमित्त 15 महिलांचा सत्कार शॉल श्रीफळ स्मृती चिन्ह देवून संस्थेने सामाजिक बांधलिकी म्हणून पंचक्रोशीतील महिलाचा सन्मान करून चांगला संदेश समाज मनात दिला आहे . पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . गुणवंत व यशवंत कीर्तीवंतव्हा शाळा समाजाचे नाव उज्वल करा . विद्यार्थी शाळा विकासासाठी सहकार्य भावनिक , आर्थिक मदत करणाऱ्या दानशूर दात्यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चोधरी यांनी मनोगत व्यक्त करतांना आभार व्यक्त केले .नविन पारितोषिक , देणगी मोठी रक्कम उपस्थितांनी जाहिर केली .सांस्कृतीक समिती प्रमुख पी सी कचरे उपप्रमुख जे पी चौधरी , समिती सदस्य एम के पाटील , एन बी चौधरी , सौ एन डी पाटील , के एम पाटील , एस पी पाटील यांनी कार्यकमाचे नियोजन केले .आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत प्रोजेक्टरवर पारितोषिक दात्यांचे नाव ठेव रक्कम पात्र विद्यार्थी व ठेवीवरील मिळालेली रक्कम असे चलचित्र के पी चौधरी व के एम पाटील यांनी दर्शनी भागात दाखण्याची सोय प्रेक्षकांना सुविधा करून देण्यासाठी प्रयत्न सहकार्य केले .संस्थेचे असंख्य भागधारक पालक संघाचे उपाध्यक्ष शिक्षक संतोष राणे सह सचिव विजय चौधरी , बाळु पाटील पालक माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . भोजन समितीने शेव भाजी , पोळी स्नेह भोजनाची उत्कृष्ट सोय केली त्याचा आनंद सर्वांनी घेतला .समिती सह जेष्ठ शिक्षक टी पी घुले यांचे सह सर्व शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनमोल सहकार्य केले .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी सी कचरे आभार सौ जे पी चौधरी यांनी केले .










