अवैध वृक्षतोड वन विभागासाठी नित्याची बाब ठरली आहे. एकिकडे दरवर्षी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना, खाजगी ठेकेदार काही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जंगलाचा सफाया करीत आहे.धरणगाव वनपरिक्षेत्रातील शेकडो अवैध वृक्षतोडीचा हा गोरखधंदा कधी थांबणार, असा प्रश्न नागरिकांना कडुन उपस्थित केला जात आहे.

मात्र असे असताना वन विभाग स्वतः का आहे आज पर्यंत धरणगाव तालुक्यात एक ही कठोर कारवाई वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली दिसुन येत नाही, संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने हा गोरख धंदा सुरू तर नाही ना असे नागरीकांना मध्ये चर्चा सुरू आहे,संरक्षित वन परिसरातील वृक्षाचे रक्षण करणे व अवैध वृक्षतोड थांबवणे, अवैध लाकूड वाहतुकीवर कारवाई करणे वनविभागयांच्याकडून अपेक्षित आहे. या विभागांचे दुर्लक्ष होत आहे.










