गंगाधर सांडू चौधरी विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात साजरे गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलनाचा रंगतदार कार्यक्रम कलाविष्कार उत्सवाच्या स्वरूपात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नाट्य परिषदेच्या सदस्या श्रीमती वैशाली पाटील, तसेच वरणगाव स्टेशनचे पोलिस सहाय्यक निरीक्षक जनार्दन खंडेराव साहेब उपस्थित होते.
श्रीनाथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संदिप चौधरी, सेक्रेटरी किशोर झोपे, जॉइंट सेक्रेटरी अमित चौधरी, माजी मुख्याध्यापक व संचालक चंद्रशेखर अवतारे, संचालक बाळकृष्ण धनगर, शाळेचे मुख्याध्यापक एम. आर. चौधरी, पर्यवेक्षक रजनी झांबरे, तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता चौधरी आणि इंग्लिश प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता बाउस्कर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस. डी. कापसे आणि श्री मुकेश मोरे यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले. विद्यार्थ्यांनी विविध कला आणि गुणांचे प्रदर्शन सादर करत स्नेहसंमेलनाचा आनंद द्विगुणित केला. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमाचा समारोप जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आला.










