दरम्यान, या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अज्ञात हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत असून माजी सरपंच उघडे यांच्यावर हल्ला का झाला? आणि कशामुळं झाला? याचे कारणही आरोपी पकडल्यानंतर समोर येणार असल्याचं सांगण्यात आले. बीड जिह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्येचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच, ठाणे जिल्ह्यातही अजनुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर भर रस्त्यात कार अडवून त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे या हल्यात माजी सरपंचाचे दोन्ही पाय तोडल्याने त्यांच्यावर कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लखोरांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. कदम उघडे असं हल्ल्यात गंभीर झालेल्या माजी सरपंचाचे नाव असून त्यांच्या कारची देखील तोडफोड करण्यात आली आहे.










