बेपत्ता पत्रकार ७२ तासांनी सेप्टिक टॅंकमध्ये मृतावस्थेत आढळला, रहस्यमी हत्येचे गूढ समोर…

 मुकेश आणि कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांच्यात रस्ता बांधकामातील भ्रष्टाचारावरून खडाजंगी झाल्याची माहिती आहे. मुकेश यांनी कंत्राटदाराच्या विरोधात भ्रष्टाचाराचे वृत्त प्रसिद्ध केले होते, ज्यामुळे ठेकेदार त्याच्यावर नाराज झाला होता. मुकेश चंद्राकर या छत्तीसगडमधील तरुण पत्रकाराच्या हत्येने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून बेपत्ता असलेल्या मुकेशचा मृतदेह एका कंत्राटदाराच्या घराच्या सेप्टिक टॅंकमध्ये ३ जानेवारी रोजी सापडला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस आणि एफएसएल पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. सेप्टिक टॅंक पूर्णपणे काँक्रीटने झाकलेली होती, ज्यावरून पत्रकाराचा मृतदेह लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

पत्रकार बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनीही मुकेशला लवकरात लवकर शोधण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांची अनेक पथके वेगवेगळ्या ठिकाणी सतत मुकेशचा शोध घेत होती. अखेर मुकेशच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन ठेकेदार सुरेश चंद्राकर यांच्या घराजवळ सापडले. यानंतर पोलिसांनी ठेकेदाराच्या घराची तपासणी केली असता त्याच्या घरातील सेप्टिक टँकमध्ये मुकेशचा मृतदेह आढळून आला.मुकेशच्या कुटुंबीयांनी सांगितले की, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक तरुणा मुकेशला घरातून बोलवत आपल्यासोबत घेऊन गेला होता. आणि तेव्हापासून मुकेशचा मोबाईल बंद होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेशला घेऊन गेलेला तरुण सध्या दिल्लीत आहे.

मुकेश आणि कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांच्यात रस्ता बांधकामातील भ्रष्टाचारावरून खडाजंगी झाल्याची माहिती आहे. मुकेश यांनी कंत्राटदाराच्या विरोधात भ्रष्टाचाराचे वृत्त प्रसिद्ध केले होते, ज्यामुळे ठेकेदार त्याच्यावर नाराज झाला होता. सुरेश चंद्राकर हे यापूर्वी एसपीओ होते. शिवाय लग्नाची मिरवणूक हेलिकॉप्टरने नेल्यानेही ते चर्चेत होते.पूर्व वैमनस्यातून कंत्राटदार सुरेश चंद्राकर याने मुकेशची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. कंत्राटदार सुरेश चंद्राकर सध्या संपूर्ण कुटुंबासह फरार आहे. त्याचा धाकटा भाऊ रितेश चंद्राकर दिल्लीला पळून गेला आहे. त्यांची कार रायपूर विमानतळावर उभी असलेली आढळून आली. मात्र, पोलिसांनी सुरेश चंद्राकर यांच्या धाकट्या भावाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सुरेश चंद्राकर यांनाही ताब्यात घेतल्याचे काही सूत्रांचे म्हणणे आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.