पत्नी जास्त बोलते, पतीने गळा दाबून पत्नीला संपविले !

पती- पत्नी हे नाते खूप प्रेमाचे व विश्वासाचे मानले जात असते. मात्र अनेकदा याच नात्यात संशय व छोट्या मोठ्या कारणाने वाद होण्याची चिन्हे मोठ्या प्रमाणात होत असतात. परंतु किरकोळ कारणावरुन पत्नीचा खून करणारा पती असू शकतो का? पत्नी जास्त बोलते म्हणून त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. सविस्तर वृत्त असे कि, कराड तालुक्यातील विंग येथे बायको जास्त बोलत असल्याने नवऱ्याने गळा दाबून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मयुरी कणसे असे (वय 27) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पत्नीचा खून करणाऱ्या पती मयूर यशवंत कणसे याला कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात विशाल सदाशिव कणसे याने पोलिसांत तक्रार दिली आहे.

त्यात म्हटले आहे की, मयूर कणसे याचे मयुरी यांचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. लग्नाच्या वर्षभरात त्यांचामध्ये वाद सुरु झाला. मयुरी हिचे मयूर याच्या कुटुंबातील लोकसोबत जमत नव्हते. त्यांच्याशी तिचे भांडण होत होते. त्यामुळे ती नवऱ्याला सोडून माहेरु निघून गेली.मयूर याने मयुरीची समजूत घालत चार महिन्यापूर्वी तिला घेऊन आला. दोन्ही नवरा-बायको येथे भाड्याच्या घरात राहू लागले. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरु होता. बुधवारी मध्यरात्रीही त्यांच्यात वाद झाला. त्या वादात मयूर याने मयुरीला रागात मारले. त्यानंतर तिचा गळा आवळला. त्यामुळे मयुरीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मयूरने मयुरी जास्त बोलते म्हणून तिची हत्या केल्याचे विशाल कणसे यांना सांगितली. त्यानंतर विशालने पोलिसात फिर्याद दिली. दरम्यान, मयुरीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. कराड तालुका पोलीस पुढील तपास करत आहे

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.