सत्यशोधक समाज संघाच्या वतीने नगरपरिषदेला निवेदन !

सत्यशोधक समाज संघाच्या वतीने नगरपरिषदेला निवेदन !उड्डाणपुलाला दिलेले सावित्रीमाईंचे नाव नूतनीकरण करावे; राजेंद्र वाघ धरणगाव : शहरातील उड्डाणपुलाला भारतातील थोर समाज सुधारक, भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका – शिक्षिका, कवयित्री, सत्यशोधिका क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे. उड्डाणपुलाला दिलेले सावित्रीमाईंचे नाव अतिशय धूसर व पुसट झालेले आहे. येणाऱ्या ३ जानेवारीला “सावित्रीमाईंचा जन्मोत्सव” संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा होतो.

याच दिवशी महाराष्ट्रात महिला शिक्षण दिन, महिला मुक्ती दिन, बालिका दिन मोठ्या उत्साहाने साजरे होतात. म्हणूनच सत्यशोधक समाज संघाच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी सो. यांना निवेदनाच्या माध्यमातून येत्या दोन-तीन दिवसात नव्याने टाकण्यात यावे या संदर्भात नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक पारधी सो. यांना देण्यात आले. याबाबत उड्डाणपुलावरील पुसट दिसणारे नाव लवकरात लवकर नव्याने टाकण्यात येईल असे आश्वासन पारधी साहेब यांनी दिले. याप्रसंगी सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, संघटक राजेंद्र वाघ, गोरखनाथ देशमुख, एच डी माळी, भागवत चौधरी, लक्ष्मणराव पाटील, विनोद रोकडे, रणजित शिकरवार, पवन महाजन, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, रामचंद्र माळी, मयूर भामरे, आकाश पांचाळ, राहुल महाजन, कुणाल सोनार, राहुल पाटील, भैय्या धनगर, संदीप फुलझाडे, राजेंद्र भोई तसेच सत्यशोधक समाज संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी धरणगाव पोलिस स्थानकाचे पी.एस.आय. संतोष पवार यांसह पोहेकॉ संजय सूर्यवंशी, पोहेकॉ सत्यवान पवार, पोहेकॉ चंदन पाटील, पोहेकॉ समाधान भागवत आदी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.