पत्नीशी वाद, घटस्फोटाची तयारी; ४० वर्षीय कॅफे मालक राहत्या घरी मृतावस्थेत आढळला, ‘त्या’ कॉलमुळे संशयाचं धुकं.

दिल्लीतील प्रख्यात कॅफेचा मालक राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. अख्खं जग नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत गुंतलेलं असताना मंगळवारी संध्याकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. ४० वर्षीय पुनीत खुराना दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्याने पोलिसांनी त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पुनीत खुराना आणि त्यांची पत्नी हे दोघे दिल्लीतील प्रसिद्ध वुडबॉक्स कॅफेचे संस्थापक आहेत. पुनीत खुराना हे मॉडेल टाऊनच्या कल्याण विहार भागात राहत होते. घरात त्यांच्या खोलीतच ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

पुनीत खुराना आणि त्यांची पत्नी मनिका जगदीश पाहवा घटस्फोट घेण्याच्या तयारीत होते. २०१६ मध्ये ते विवाहबंधनात अडकले, मात्र लग्नाच्या वर्षांनी त्यांच्या नात्यात कुरबुरी सुरु झाल्या. दिल्लीतील वुडबॉक्स कॅफेचे मालक असलेल्या या दोघांमध्ये व्यवसायावरुनच वाद होते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. खुराना कुटुंबाच्या माहितीनुसार पुनीत या प्रकरणावरुन नाराज होते.एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार १६ मिनिटांच्या एका ऑडिओ क्लीपमध्ये, पुनीत खुराना आणि त्यांची पत्नी मनिका यांच्यात व्यावसायिक मालमत्तेवरुन भांडण सुरु असल्याचे ऐकू येते. “आपण घटस्फोट घेत असलो, तरीही मी अजूनही तुझी व्यावसायिक भागीदार आहे. तुला माझी देय रक्कम भरावीच लागेल” असे मनिका पुनीत यांना कॉलवर बोलत असल्याचे ऐकू येते. पोलिसांनी पुनीत खुराणा यांचा फोन जप्त केला असून त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावले आहे.नुकतेच बेंगळुरुचे तंत्रज्ञ अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच ही घटना घडली आहे. ३४ वर्षीय उपमहाव्यवस्थापक अतुल सुभाष यांनी डिसेंबरमध्ये आत्महत्या केली होती. त्यांनी २४ पानी सुसाईड नोट मागे सोडली होती. त्यात पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर छळाचा आरोप केला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.