एक लाखाची लाच मागणारे दोन वायरमन एसीबीच्या जाळ्यात

जळगावातून पुन्हा एकदा लाचखोरीची बातमी समोर आलीय. वीज मीटर नादुरुस्त असून गुन्हा दाखल होऊ नये यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणारे दोन वायरमन (पूर्ण नाव समजू शकले नाही) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या जाळयात अडकले

जळगावातील 30 वर्षीय तक्रारदार यांच्या घरचे पाच वीज मीटर महावितरणच्या भरारी पथकाने काढून नेले व ते नादुरुस्त असल्याचे सांगितले. या प्रकरणात वीजचोरीचा गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसल्यास एक लाख ५० रुपयांची मागणी केली. यात तडजोडीअंती एक लाख रुपये स्वीकारण्याचे दोघांनी मान्य केले. या विषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.पथकाने लाचेच्या मागणीविषयी पंचांसमक्ष खात्री केली असता एका मीटरसाठी ३० हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख ५० हजार रुपये मागितले. मात्र, एक लाख रुपयांमध्ये तडजोड झाल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने या दोघा वायरमनला मंगळवारी (३१ डिसेंबर) ताब्यात घेतले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..