ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी बायको, संतोष देशमुख यांच्या भावाचा खळबळजनक दावा.

सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून असून संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. काल दुपारनंतर ज्योती जाधव यांची तब्बल चार तास चौकशी करण्यात आली. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडी अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खंडणी प्रकरणात फरार आरोपी वाल्मिक कराड याच्याबद्दल गौप्यस्फोट केला. ज्योती जाधव ही वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला.सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून असून संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. काल दुपारनंतर ज्योती जाधव यांची तब्बल चार तास चौकशी करण्यात आली.सीआयडी अधीक्षकांच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड यांच्या पत्नीचा तपास सुरु असल्याची माहिती दिली. मात्र त्यावेळी ज्योती जाधव यांची चौकशी सुरु होती. ज्योती जाधव ही वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला. कराड सुरुवातीच्या दिवसात तिच्याकडे राहायला असल्याचा दावा केला जात आहे.

दुसरीकडे, ‘जे माझ्या वडिलांसोबत घडले, ते इतरांसोबत घडू नये, यासाठी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्या. त्यामुळे कोणताच गुन्हेगार असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. माझी जिजाऊ जन्मस्थळावरून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, की माझ्या वडिलांना न्याय द्या,’ अशी आर्त मागणी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे विराट मोर्चात केली.संतोष देशमुख यांची हत्या व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ सिंदखेड राजा येथे सोमवारी राष्ट्रमाता माँ जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या राजवाड्यापासून तहसील कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी, मुलगा विराज आणि बहिणीसह मस्साजोगमधील नातेवाइक; तसेच नागरिक सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, या मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..