भुसावळ मतदार संघाचे अजिंक्य व्यक्तीमत्व नुकतेच विजयी होवून वस्त्रउद्योग मंत्रीपद मिळाल्या बद्यल ना . मंत्री आमदार संजय सावकारे यांचे थोर सक्षम फाऊंडेशन भुसावळ यांचे वतीने सहृदय सत्कार करण्यात आला तथा भेट दि . 29 डिसेंबर दुपारी संपन्न झाली .

थोर सक्षमचे प्रमुख मार्गदर्शक परशुराम चौधरी , प्रमोद लोणे , प्रकाश चौधरी , मनोज कुरकुरे , विलास झांबरे , सूर्यकांत पाटील , चेतन चौधरी योगेश रोटे , युवराज कुरकुरे, संदीप पाटील , डॉ नयन महाजन , आनंदा कोलते ,गिरीश शिंदे ,अतुल पाटील, तुषार कुरकुरे, डिगंबर पाटील . यांची प्रमुख उपस्थिती होती .थोरगव्हाणकर लेवा पाटील समाज साठी थोर सक्षम फाऊंडेशनने केलेल्या निस्वार्थ उत्कृष्ठ कामाची आठवण , स्तुती मंत्रीमोहोदयांनी केली .
सामाजिक प्रश्न सोडवणूक कार्यासाठी माझे सहकार्य आहे असे अश्वासन दिले . त्यांना राजकीय करीयर व वस्त्रोद्योग मंत्री या जबाबदारी साठी महाराष्ट्राची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले .









